आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Actress Sai Tamhankar Marriage And Divorce Story स्वप्निलपासून उर्मिलापर्यंत, हे स्टार्स होते सईच्या लग्नात हजर, तीन वर्षांतच झाला घटस्फोट

PIX: स्वप्निलपासून उर्मिलापर्यंत, हे स्टार्स होते सईच्या लग्नात हजर, तीन वर्षांतच झाला घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीला ग्लॅमर मिळवून देणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतीच वयाची 32 वर्षे  पूर्ण केली आहेत. 25 जून 1986 रोजी सांगलीतील सईचा जन्म झाला. मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. इंडस्ट्रीत स्वबळावर तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सई घटस्फोटित असल्याचे एव्हाना सगळ्यांनाच कळले आहे. पाच वर्षांपूर्वी सईचे अमेय गोसावीसोबत लग्न झाले होते. पण दीड वर्षांपूर्वीच सईने अमेयपासून घटस्फोट घेतला आहे. याचवर्षी एका मुलाखतीत सईने याचा उलगडा केला. 15 डिसेंबर 2013 रोजी सई अमेयसोबत विवाहबंधनात अडकली होती. रजिस्टर्ड पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर मुंबईत शानदार रिसेप्शन पार्टी पार पडली होती. रजिस्टर्ड लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील सईचे जवळचे मित्र उपस्थित होते. सुशांत शेलार, पत्नी लीनासोबत स्वप्नील जोशी, आदिनाथ आणि उर्मिला कोठारे, मनवा नाईक, गिरीजा ओक आणि सुहृज गोडबोले हे या लग्नाला हजर होते. 


 आता जरी सई आणि अमेय यांचे मार्ग विभक्त झाले असले तरी एकेकाळी दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. कशी सुरु झाली होती दोघांची लव्ह स्टोरी टाकुयात यावर एक नजर... 


अशी सुरु झाली होती सई-अमेयची लव्हस्टोरी...
सईचा पुर्वाश्रमीचा नवरा अमेय प्रोड्युसर असून व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्षेत्रात काम करतो. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून सई आणि अमेयची भेट झाली होती. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सईनेच अमेयला प्रपोज केल्याचे म्हटले जाते. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, सई आणि अमेयच्या लग्न आणि रिसेप्शनचे निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...