आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Film Farzand Success Party It\'s Party Time: ‘फर्जंद’च्या सक्सेस पार्टीत पोहोचले मराठी स्टार्स, सिंपल लूकमध्ये दिसली मृण्मयी

It\'s Party Time: ‘फर्जंद’च्या सक्सेस पार्टीत पोहोचले मराठी स्टार्स, सिंपल लूकमध्ये दिसली मृण्मयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी कलाकृती उत्तम असेल तर प्रेक्षक आणि प्रसार माध्यमांकडून तिचे दणक्यात स्वागत होतेच. चित्रपटाच्या  मुहूर्तापासून आपले वेगळेपण अधोरखित करणाऱ्या 'फर्जंद' या मराठी चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. सर्वांच्या अपेक्षेवर खरं उतरत फर्जंद चित्रपटाची यशस्वी घौडदौड आजतागायत सुरु आहे. 1 जूनला प्रदर्शित झालेल्या 'फर्जंद' चित्रपटाने तीन आठवड्यात चांगला गल्ला जमवला असून आता चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळवतोय. चित्रपटाला मिळालेले हे घवघवीत यश साजरे करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच एकत्र जमली होती. या यशाला कृतज्ञतेची झालर ही होती. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, गायिका वैशाली सामंत, प्रसाद ओक, अंशुमन विचारे, चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी यांच्यासह अनेक सेलेब्स पार्टीत हजर होते. यावेळी मृण्मयी सिंपल लूक दिसली. 

 

 चित्रपटाचे हे यश साजरे करत असताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने 4 माध्यम प्रतिनिधींचा सत्कार याप्रसंगी केला. रसिकांनी हा चित्रपट उचलून धरल्याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त करतानाच, ‘चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे समाधान’ यावेळी व्यक्त केले.

 

कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘फर्जंद’ या चित्रपटातल्या कलाकारांच्या कामगिरीचेदेखील सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे. या चित्रपटाचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. फर्जंद सिनेमा चौथ्या आठवड्यातही महाराष्ट्राच्या अनेक चित्रपटगृहात आवडीने पाहिला जात आहे ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत चित्रपटगृहे आजही ‘फर्जंद’मय झालेली पहायला मिळत आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’चे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केलं आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, 'फर्जंद'च्या सक्सेस पार्टीला पोहोचलेल्या मराठी सेलिब्रिटींची खास छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...