आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Serial Lagira Zala Ji Vat Purnima Special Telly World : शीतली साजरी करणार पहिली वटपौर्णिमा, येणार आहे मालिकेत हा Twist

Telly World : शीतली साजरी करणार पहिली वटपौर्णिमा, येणार आहे मालिकेत हा Twist

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जी' या मालिकेत अलीकडेच शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.

 

लग्नानंतर शीतल तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. वटपौर्णिमेचे व्रत म्हणजे विवाहित स्त्रियांसाठी सौभाग्याचं लेणं. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण वटपौर्णिमेच्या दिवशी लागीरं झालं जी मध्ये प्रेक्षक एक वेगळं वळण पाहू शकणार आहेत.

 

अजिंक्यची पोस्टिंग व्हायच्या आधी शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाला बार उडवून दिला जातो. अनेक उतार चढावांना समोर जात शीतल आणि अजिंक्य त्यांचा संसार आणि घरची एकंदर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इतक्यातच वटपौर्णिमेच्या दिवशी अजिंक्यच्या पोस्टिंगचं पत्र येतं. आता कुठे एकत्र आलेले दोन प्रेमी जीव अजिंक्यला देशसेवेसाठी सीमेवर जावे लागत असल्यामुळे परत दुरावणार या विचाराने शीतल थोडी अस्वस्थ होते. पण जोपर्यंत अजिंक्य गावी आहे तो पर्यंत त्याचा सगळा वेळ तो शीतलला द्यायचं ठरवतो. शीतल आणि अजिंक्यचा सुखी संसार असाच सुरळीत चालू राहील का? त्या दोघांच्या आयुष्यात अजून कुठले वळण येईल? हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, वटपौर्णिमेच्या निमित्ताने अजिंक्य आणि शीतल यांचे फोटोशूट...

 

बातम्या आणखी आहेत...