Home | Bollywood | Marathi Cinekatta | Marathi Serial Tuza Maza Breakup Meera and Menka

मीरा आणि मेनका: एकीची तपश्चर्या संपलीच नाही तर दुसरीचा जन्मच तपश्चर्या भंगासाठी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 29, 2018, 11:03 AM IST

एक मीरा तर दुसरी मेनका. पौराणिक कथा इतिहासात या नावांचा शोध घेतला तर ही दोन्हीही नावे कधीही, कुठेही समोरासमोर आलेली नाही

 • Marathi Serial Tuza Maza Breakup Meera and Menka
  तुझं माझं ब्रेकअपमधील मीरा (केतकी चितळे) आणि समीर (संकेत कामत).

  सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या 'तुझं-माझं ब्रेकअप' या सीरियलमध्ये मीरा आणि मेनकामधील कोल्डवॉर तुम्ही पाहात असाल. मीरा ही समीरची बायको. या दोघांचे ब्रेकअप करण्यासाठी मेनका काय-काय क्लृप्त्या शोधून काढते... या दोघींच्या हिंदोळ्यावर झुलतोय तो समीर. यामुळे सीरियल दिवसेंदिवस इंट्रेस्टिंग होत आहे. मात्र या सीरियलमधील प्रमुख स्त्रीपात्रांची नावं ही अधिक इंट्रेस्टिंग आहेत. एक आहे 'मीरा' तर दुसरी आहे 'मेनका'. पौराणिक कथा आणि इतिहासात या नावांचा शोध घेतला तर ही दोन्हीही नावे कधीही, कुठेही एकमेकांसमोर आलेली नाहीत. मात्र आपापल्या ठिकाणी ही दोन्हीही पात्र ग्रेट आहेत.

  कोण होत्या मीरा आणि मेनका...

  - मीरा आणि मेनका भारतीयांना माहित नाही असे होणार नाही. मीरा श्रीकृष्णाच्या प्रेमात अकांठ बुडालेली होती. मीराबाईचे लग्न होते, मात्र तिची कृष्णभक्ती तसूभरही ढळत नाही. सासरच्यांकडून तिचा छळ होतो. विषाचाही प्याला तिला प्यावा लागतो. दुसरीकडे मेनका... साक्षात स्वर्गलोकीची सर्वश्रेष्ठ अप्सरा. जिच्या सौंदर्याने भल्याभल्या तपस्वींची तपस्या भंग झाली. इंद्राने विश्वमित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेची निवड केली आणि ती यात यशस्वीही झाली. अशा या मीरा आणि मेनका... एकीची तपश्चर्या आयुष्यभर संपली नाही तर दुसरीचा जन्मच तपश्चर्या भंग करण्यासाठी झालेला.

  या सीरियलमध्ये मीरा ही समीरची पत्नी आहे. समीरवर निस्सीम प्रेम करणारी, परंतू मेनकासोबतच्या त्याच्या जवळीकीमूळे दुखावलेली आहे. तर समीर हा हवेच्या झोक्या प्रमाणे कधी मीरेच्या दिशेने वाहतो तर कधी मेनकेसोबत वाहवत जातो.

  कशी होती पौराणिक कथांमधील मेनका आणि मीरा... जाणून घ्या पुढील स्लाइडवर...

 • Marathi Serial Tuza Maza Breakup Meera and Menka

  मीरा आणि मेनका ही भारतीय इतिहास आणि पौराणिक कथांमधील सुपरिचीत पात्र आहेत.  - 16व्या शतकात मीराबाईंचा जन्म झाला होता. कृष्णभक्तीची अनेक काव्य त्यांनी रचली. त्या कृष्ण भक्तीत तल्लीन होऊन जात. बालपणापासून श्रीकृष्णाची ओढ त्यांना होती. श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे त्याचे गोडवे गात त्या तासन् तास नाचत. 
  - मीराबाईंचे लग्न उदयपूरचे महाराणा कुवंर भोजराज यांच्यासोबत झाले होते. पती प्रेमापेक्षा कृष्णभक्तीमध्ये त्या अधिक रममाण राहात होत्या. 

   

  पुढील स्लाइडमध्ये वाचा, सती जाण्यास मीराबाई करतात विरोध...

 • Marathi Serial Tuza Maza Breakup Meera and Menka

  - मीराबाईंबद्दल असेही सांगितले जाते, की त्यांच्या नणंदेने भावाला अर्थात महाराणा कुंवर यांना सांगितले की तुझी पत्नी रोज मंदिरात कोणलातरी भेटायला जाते. तिथे त्याच्यासोबत हसते-खेळते, गप्पा मारते. जेव्हा कुंवर भोजराज यांनी जातीने मंदिरात जाऊन पाहिले तर मीराबाई कृष्णाच्या मूर्तीपुढे बसून साक्षात भगवान श्रीकृष्णासोबत गप्पा मारत असतात. 

 • Marathi Serial Tuza Maza Breakup Meera and Menka

  - पतीच्या निधनानंतर मीराबाईंना सती जाण्याचाही आग्रह झाला होता. मात्र त्यांनी त्याला नकार दिला. श्रीकृष्णालाच आपला प्रियकर आणि पती मानणाऱ्या मीराबाईंनी त्यानंतर द्वारका आणि वृंदावनाला जाणे पसंत केले. येथे त्यांना मान-सन्मान मिळाला.  

 • Marathi Serial Tuza Maza Breakup Meera and Menka

  स्वर्गलोकीच्या सहा अप्सरांपैकी सर्वश्रेष्ठ होती मेनका 
  - पौराणिक कथांनुसार मेनका ही स्वर्गलोकीच्या सहा सर्वश्रेष्ठ अप्सरांपैकी एक होती. 
  - कश्यप आणि प्राधा यांची ही कन्या आणि ऊर्णयू नावाच्या गंधर्वाची पत्नी होती. 
  - मेनकेचे सौंदर्य हे अपूर्व होते. आपल्या सौंदर्याने ती कोणालाही मोहित करु शकत होती. 
  - देवाधी देव इंद्राने विश्वमित्र ऋषिंची तपस्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवले होते. 
   

  काय आहे मेनकेच्या मुलीचे नावे... 

 • Marathi Serial Tuza Maza Breakup Meera and Menka

  - विश्वमित्राची तपस्या भंग करण्यात मेनका यशस्वी झाली. विश्वमित्रापासून मेनकेला एक कन्यारत्न प्राप्त झाल्याचे पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे. या मुलीला मेनका मालिनी किनाऱ्यावर सोडून स्वर्गात निघून जाते. 
  - शकून पक्षांकडून या बालिकेचे रक्षण केले जाते त्यामुळे महर्षि कण्व तिचे नाव शकुंतला ठेवतात. दुष्यंताची पत्नी झालेली शकुंतला एका मुलाची आई होते. त्याचे नाव भरत. 

Trending