आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड \'शिकारी\'मध्ये मृण्मयीचा गावरान ठसका, या कारणामुळे स्वीकारला रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश मांजरेकरांच्या आगामी ‘शिकारी’ या  चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या बोल्ड पोस्टर्स आणि ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल दोस्ती दुनियादारी या गाजलेल्या मालिकेत झळकलेला सुव्रत जोशी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय. तर नेहा खान या अभिनेत्रीचा बोल्ड अवतार चित्रपटात आहे. या दोघांसोबत चित्रपटातील सरप्राईज पॅकेज आहे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. या चित्रपटात मृण्मयीचा गावरान ठसका लक्ष वेधून घेणार आहे.

 

‘शिकारी काम करताना करताना मला मजा आली. आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. माझी जी वेगळी इमेज आहे त्यापेक्षा या रोलमध्ये वेगळेपण होते म्हणून मी हा रोल निवडला’, असे मृण्मयी देशपांडे हिने सांगितले.

 

ती पुढे म्हणाली की ‘महेश मांजरेकर आणि विजू माने यांच्यामुळेच मी या चित्रपटात आले. महेश मांजरेकर सरांनी मला जेव्हा या रोलविषयी विचारलं तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकले नाही’. चित्रपटातील तिच्या रोलविषयी विचारल्यावर मृण्मयी देशपांडे म्हणाली की ‘या चित्रपटात स्त्रीच्या निरागस जीवनात अचानक अशा अनेक गोष्टी घडतात, त्याचा ती सामना कसा करते, हे सगळे तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल’.

 

पुढे वाचा, मृण्मयीच्या भूमिकेविषयी काय म्हणाले दिग्दर्शक विजू माने... 

बातम्या आणखी आहेत...