आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभमंगल सावधान.... संग्राम-खुशबू अडकले लग्नाच्या बेडीत, बघा Wedding अल्बम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, श्रृती मराठे, पल्लवी पाटील, मनवा नाईक, मयुरी वाघ आणि प्रार्थना बेहरेनंतर मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री बोहल्यावर चढली आहे. आम्ही बोलतोय ते मराठी आणि हिंदी मालिकांतील प्रसिद्ध चेहरा असलेल्या खुशबू तावडे हिच्याविषयी. अभिनेता संग्राम साळवीसोबत खुशबू सोमवारी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. मुंबईत महाराष्ट्रीय पद्धतीने दोघांचे शुभमंगल झाले. लग्नात खुशबुने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. नववधूच्या रुपात खुशबू अतिशय सुरेख दिसली. संग्राम आणि खुशबू यांचे हे लव्ह मॅरेज आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. संग्राम आणि खुशबू चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या सांजबहरमध्ये झळकले होते. 


लग्न-रिसेप्शनला सेलिब्रिटींची हजेरी... 
संग्राम साळवीने खुशबू आणि त्याचा हळदीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याला कॅप्शन दिले, 'झाले...' खुशबूच्या मेंदी आणि हळदीचे अनेक फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहेत. सोमवारी लग्नानंतर रिसेप्शन पार पडले. रिसेप्शनला मराठीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सुयश टिळक, अभिज्ञा भावे, नम्रता आवटेसह अनेक सेलिब्रिटी खुशबू आणि संग्राम यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन हजर होते. 


'देवयानी' मालिकेमुळे घराघरांत पोहोचला संग्राम... 
खुशबूप्रमाणेच संग्रामदेखील मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. 'देवयानी' या मालिकमुळे संग्राम साळवी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या मालिकेतील तुमच्यासाठी काय पण हा त्याचा संवाद चांगलाच गाजला होता. तर अलीकडेच संग्राम 'गुलमोहर' या मालिकेतील 'खांडवी वर्सेस वडापाव' या भागात अभिनेत्री सायली संजीवसोबत झळकला आहे. 


मराठीसह हिंदीत झळकली आहे खुशबू... 
खुशबू तावडे हे नाव केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकेच प्रसिद्ध आहे. 'तू भेटशी नव्याने', 'पारिजात' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले असून 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'सिंहासन बत्तीसी' यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिने 'तेरे बीन' या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. खुशबूची बहीण तितिक्षा तावडे हीदेखील एक अभिनेत्री आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, खुशबू आणि संग्राम यांच्या मेंदी, हळदी, लग्न आणि रिसेप्शनचे खास Photos... 

बातम्या आणखी आहेत...