आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Subodh Bhaves Film Balgandharva Look Trail Photos \'बालगंधर्व\' चित्रपटासाठी सुबोध भावेने केले होते हे पहिले फोटोशूट

Look Trail Pics: \'बालगंधर्व\'साठी असे झाले होते सुबोध भावेचे पहिले शूट, ही आहे कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज बालगंधर्व यांची जयंती. मराठी रंगभूमीवर विसाव्या शतकात अतिशय लोकप्रिय ठरलेले गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर 'बालगंधर्व' हा चित्रपट 6 मे 2011 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून नितीन चंद्रकांत देसाई यांनी बालगंधर्वांचे आयुष्य रुपेरी पडद्यावर रेखाटले. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या चित्रपटातील बालगंधर्वांच्या भूमिकेला सुबोधने योग्य न्याय दिला. स्त्री पात्रात वठवताना सुबोधने भूमिकेत जीव ओतला. या भूमिकेसाठी जेव्हा सुबोधला समजले होते, तेव्हा त्याने प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल शिधये यांना फोन करुन एक्सपिरिमेंटल शूट करायचे असल्याचे त्यांना सांगितले. अतुल शिधये यांनी या शूटच्या वेळीचा किस्सा आणि सुबोधच्या लूक ट्रायचे फोटोज त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. त्यांनी सांगितलेला किस्सा आणि फोटोशूटची झलक या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवतोय.  


अतुल शिधये यांनी लिहिले, "काही महिन्यांपूर्वी अचानक सुबोधचा फोन आला. अतुल जरा एक्सपिरिमेंटल शूट करायचे आहे. मी माझा पर्सनल मेकअप आर्टिस्ट घेऊन येतो. संयोगिता भावे कॉश्च्युम आणि ज्वेलरी अरेंज करत आहे. तू फक्त झटपट काही मोजके फोटो काढून दे मला... बालगंधर्वाच्या गेटअपमध्ये फोटो काढायचे आहेत... ते फोटो मी नितीन देसाई यांना दाखवणार आहे... कारण ते बालगंधर्व फिल्म बनवत आहेत... बस्स मग काय अक्षरशः ती मंडळी आली आणि दोन तासांत परतसुद्धा गेली. मला तेव्हा जरासुद्धा कल्पना नव्हती की, आपण केलेल्या या अक्षरशः धन्यवाद शूटनंतर इतकी काही महान फिल्म बनणार आहे. खरंच माझं हे शूट फार काही महान नाहीये, हे मला माहित आहे. पण तरीही सुबोधच्या करिअरच्या ग्राफचे एक छोटेसे वळण अगदी माझ्याही नकळत माझ्या स्टुडिओमधून पडून गेले आहे, ही जाणिव खूप सुखद आहे. म्हणून हे अपलोड... लव्ह यू सुबोध.. गॉड ब्लेस यू... खूप कमालीचा गोड दिसला आहे तू या फिल्ममध्ये..."  सुबोधच्या लूक ट्रायलचे हे फोटो रणजीत देवकुळे यांनी एडिट केले आहेत. 

 

बालगंधर्व यांचा अल्पपरिचय... 
बालगंधर्व यांचे संपूर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस. 26 जून 1988 रोजी नागठाणे (सांगली) येथे त्यांचा झाला होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील ते प्रसिद्ध मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते . रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. 


त्यांनी संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर (नाटक), संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला सह एकूण 25 विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. 1955 मध्ये नी 'एकच प्याला' नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. 15 जुलै 1967 रोजी वृद्धापकाळामुळे आणि दीर्घ आजाराने बालगंधर्वांचे निधन झाले.


पुढील स्लाईड्सवर बघा, बालगंधर्व या चित्रपटासाठी सुबोध भावेने केलेल्या पहिल्या लूक ट्रायलचे हे खास फोटोज..

 

(फोटो सौजन्य - प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल शिधये फेसबुक पेज)

 

बातम्या आणखी आहेत...