आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिरुद्ध म्हणतो, \'मी तुमचे आभार मानणार नाही तर...\', बघा महाअंतिम सोहळ्याची क्षणचित्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अलीकडेच पार पडला. अनिरुध्द जोशी याने सूर नवा ध्यास नवाचा राजगायक होण्याचा मान पटकावला. विजेता ठरल्यानंतर अनिरुद्धने रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. तो म्हणाला, "माझ्याकडे शब्द नाहीत, तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानणार नाही तर तुमच्या ऋणात राहणं पसंत करीन... मनापासून धन्यवाद सगळ्या रसिक प्रेक्षकांचे... माझ्या सगळ्या गायक मित्रांचे, सगळ्या वादकांचे, अवधूत गुप्ते, महेश काळे, शाल्मली, प्रशांत नाईक, कपिल इंगोले, संदेश घुगे, निखिल साने, तेजश्री प्रधान, पर्पल पॅच मिडियाज, कलर्स मराठी आणि संपूर्ण सूर नवा ध्यास नवा टीमचे..."

 

अनिरुध्द जोशीला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, मानाची कटयार मिळाली तसेच केसरी टूअर्स तर्फे ऑस्ट्रेलियाचा दौरा तर निहिरा जोशी, प्रेसेनजीत कोसंबी, शरयू दाते आणि विश्वजित बोरवणकर या उपविजेत्यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश मिळाला. 


पुढील स्लाईड्सवर बघा, सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याची खास क्षणचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...