आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BB मराठी : रेशम आणि राजेशमधून कोण जाणार घराबाहेर..का रडली रेशम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जाते. परंतु रविवारी प्रेक्षकांसह घरातील सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण महेश मांजरेकर यांनी घरातून कोण बाहेर जाणार याचा निकाल सोमवारी लागणार अशी घोषणा केली. सध्या नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी रेशम आणि राजेश डेंजर झोन मध्ये आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण या आठवड्यामध्ये घराबाहेर जाईल, हे सोमवारी रात्री स्पष्ट होईल. 


दरम्यान, सोमवारच्या एपिसोडमध्ये या दोघांपैकी एक जण घराच्या बाहेर जाण्याआधी महेश मांजरेकर त्यांच्याशी बोलल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. यावेळी रेशम टिपणीस रडताना दिसत आहे. त्यामुळे कदाचित राजेश घराबाहेर गेला की काय? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमकं कोण घराबाहेर गेले याबाबत आजच्या एपिसोडनंतर समोर येणार आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, सोमवारच्या एपिसोडच्या प्रोमोचे काही स्क्रीनशॉट्स...

बातम्या आणखी आहेत...