आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: \'फुलपाखरु\'मध्ये मानस आणि वैदेहीची रोमँटिक केमिस्ट्री, आतापर्यंत शूट झाली मालिकेत 12 गाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी युवा या वाहिनीवरील  'फुलपाखरू' या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे आणि या मालिकेने एक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करून लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे - फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे 'फुलपाखरू'. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. तसेच या मालिकेत प्रेक्षकांनी अजून एक वेगळी गोष्ट अनुभवली ती म्हणजे श्रवणीय गाणी. नुकतंच यशोमन आणि हृता यांनी पावसाळी ऋतूत धुंद होणारे एक गाणे शूट केले.  

 

मानस आणि वैदेही यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही उत्तमच आहे जी प्रेक्षकांना देखील भावते. याआधी देखील या मालिकेत अनेक गाणी प्रेक्षकांनी पाहिली पण आता प्रेक्षक एक पावसाळी रोमँटिक गाणं फुलपाखरू मध्ये पाहू शकणार आहेत. पाऊस गारवा आणि प्रेम या गोष्टींचा उत्तम मेळ साधून दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या गाण्याचं चित्रीकरण केलं. फुलपाखरू या मालिकेत एका वर्षात आतापर्यंत एकूण १२ गाणी चित्रित होऊन प्रेक्षकांच्या भेटीस अली. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही मालिकेत इतकी गाणी चित्रीत झालेली नाहीत, त्यामुळे या बाबतीत मालिकेने एक रेकॉर्ड केला आहे.


दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, "पावसाळा हा प्रेमाचा ऋतू असतो आणि म्हणूनच आम्ही हे गाणं चित्रित करण्याचा निर्णय घेतला. हा प्रेमाचा ऋतू या दोन प्रेमींसोबत या गाण्यातून प्रेक्षांच्या भेटीस लवकरच येणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही खूप धमाल केली. एक एनर्जेटिक टीम सोबत तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा काम करताना देखील एनर्जी येते. फुलपाखरूमध्ये एकूण १२ गाणी शूट केल्याचा वेगळाच विक्रम आम्ही केला आहे आणि याचा मला आनंद आहे."


पाहुयात. मानस आणि वैदेहीची रोमँटिक केमिस्ट्री छायाचित्रांमध्ये.. 

 

बातम्या आणखी आहेत...