आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#2YearOfSairat: हे आहे प्रेक्षकांना \'याड\' लावणा-या अभिनेत्रीचे खरे घर, पाहा Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः संपुर्ण महाराष्ट्राला याड लावणारा चित्रपट 'सैराट' ला दोन वर्ष पुर्ण झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या चित्रपटाने आपली वेगळी छाप पाडली. मराठी चित्रपटाला या माध्यमातून एक उंच शिखर गाठता आले. या चित्रपटातील अभिनेत्री रिंगू राजगुरु म्हणजेच आपल्या 'आर्ची' च्या प्रेमात तर सर्व महाराष्ट्र सैराटमय झाला होता. प्रेक्षकांना सैराटमय करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु मुळची अकलूजची असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. आता या शहराची चर्चा रिंकूमुळे जास्त होऊ लागली आहे. 'सैराट' या सिनेमातून रिंकूने मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली आणि आईवडिलांसोबतच आपल्या शहराचे नाव उंचावले. अकलूजमध्ये आईवडील, धाकटा भाऊ आणि आजी-आजोबांसोबत रिंकू वास्तव्याला आहे. अकलूजच्या संग्राम नगर येथे रिंकूचे घर आहे. रिंकूचा पहिला सिनेमा असलेल्या 'सैराट'च्या रिलीजला दोन एक वर्ष पूर्ण झालंय. मागील वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 29 एप्रिल रोजी 'सैराट' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि पुढे घडलेला इतिहास सर्वश्रुत आहे. 'सैराट'च्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला दाखवतोय सैराटची नायिका रिंकू राजगुरु हिच्या घराची खास झलक...

 

अकरा वर्षांपूर्वी नवीन घरात शिफ्ट झाले रिंकूचे कुटुंब....
रिंकूचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. मुळचे अकलूजचे असलेले रिंकूचे वडील महादेव राजगुरु यांनी अकरा वर्षांपूर्वी अकलूजच्या संग्राम नगर परिसरात मोठे घर बांधले. त्यांचे हे घर दुमजली आहे. वरती आणि खाली चार-चार खोल्या आहेत. घरासमोर मोठे अंगण असून नारळ, आंबा, पेरु आणि वेगवेगळ्या फुलांची भरपूर झाले आहेत. या घरात येण्यापूर्वी रिंकूचे कुटुंब अकलूजच्या राऊत नगरमध्ये वास्तव्याला होते. रिंकू सहा वर्षांची असताना राजगुरु कुटुंबीय नवीन घरात आलेत. याच घरात रिंकूचा धाकटा भाऊ सिद्धार्थचा जन्म झाला.

 

घराच्या भिंतींवर रिंकूने लावली स्वतः रेखाटलेली चित्रे
रिंकूला नृत्यासोबतच गायन आणि चित्रकलेची आवड आहे. तिने चित्रकलेची एलिमेंट्री परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिंकूने स्वतः काढलेली चित्रे तिने आपल्या बेडरुममध्ये लावली आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, रिंकूच्या घराची खास झलक...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...