आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 Yrs of CID:111 मिनिटांच्या सीनचे सिंगल टेक केले होते शूट,'एसीपी प्रद्युमन'नी सांगितल्या आठवणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती असलेली मालिका  CID ने 20 वर्षे पूर्ण केले आहे. 28 जानेवारी 1998 साली या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. यातील प्रत्येक भूमिका तुफान गाजली. एसीपी प्रद्युमन हे पात्र तर घराघरात लोकप्रिय झाले. मग तो द्या असो अथवा सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत यांचे संवादही लोकांच्या मुखोद्गत झाले. काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी या मालिकेने 20 वर्षे पूर्ण केली आहे. यानिमित्त एसीपी प्रद्युमन म्हणजेच शिवाजी साटम यांनी एका मुलाखतीत प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी त्यांच्या आवडीच्या एपिसोडविषयीही सांगितले. 

 

तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘मालिकेसंदर्भातील अविस्मरणीय गोष्ट म्हणजे २००४ मध्ये १११ मिनिटांसाठी शूट केलेला एपिसोड. ७ नोव्हेंबर २००४ रोजी हा एपिसोड प्रसारित झाला होता. या एपिसोडच्या सुरुवातपासून शेवटचा सीन एकाच शॉटमध्ये चित्रीत करण्यात आला होता. १११ मिनीटांचे सीन एकाच शॉटमध्ये चित्रीत झाले होते,’ असे ते म्हणाले. सीआयडीच्या या विशेष एपिसोडची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. हा एपिसोड शूट करण्यासाठी टीमने सलग सहा दिवस सराव केला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सीआयडी मालिकेचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...