आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2nd Wedding Anniversary : मृणाल-नीरजचा हा रोमँटिक अंदाज पाहिलात का तुम्ही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः  ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मराठी मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृणाल दुसानीस आज तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. मुळची नाशिकची असलेली मृणाल 25 फेब्रुवारी 2016 रोजी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या नीरज मोरेसोबत विवाहबद्ध झाली.  नाशिकची मृणाल आता पुण्याची सून आहे. नीरज नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहे. लग्नानंतर मालिकेचे शूटिंग पूर्ण करुन मृणालसुद्धा आता अमेरिकेत राहते.  

 

लग्नानंतर समोर आले होते प्री वेडिंग फोटोशूट... 

2016 मध्ये लग्नाच्या महिन्याभरानंतर मृणालने नीरजसोबतची खास छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली  होती. ही छायाचित्रे म्हणजे नीरज आणि मृणालचे यांचे प्री-वेडिंग फोटोशूट होते. या फोटोशूटमध्ये या क्यूट कपलची रोमँटिक केमिस्ट्री लक्ष वेधून घेते. मुंबईतील बोरिवली स्थित संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मृणाल आणि नीरजने हे फोटोशूट केले होते.

 

आज मृणाल आणि नीरजच्या लग्नाच्या दुस-या वाढदिवसाचे औचित्य साधत, बघुयात, या क्यूट कपलच्या प्री वेडिंग फोटोशूटची झलक....

 

फोटो साभार - मृणाल दुसानिस फेसबुक 

बातम्या आणखी आहेत...