आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#2YearOfSairat: आर्ची, प्रिन्‍स, लंगड्या कुठे -कुठे चुकले, वाचा त्‍यांनीच सांगितलेले किस्‍से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडील प्रेक्षकांना याडं लावणा-या 'सैराट' या सिनेमाच्या रिलीजला 29 एप्रिल रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहे. दोन वर्षानंतरही ‘सैराट’ची क्रेझ तीळमात्रही कमी झालेली नाही. चित्रपटातील आर्ची, परशा, लंगड्या, सल्या, प्रिन्स यांची क्रेझ आजही कायम आहे. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, डीडीएलजे या चित्रपटांनी जसा हिंदी चित्रपटात इतिहास रचला तसाच मराठी चित्रपटसृष्टीत सैराटने केला. 100 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला मराठी चित्रपट सैराट ठरला. चित्रपटाने अगदी पहिल्या दिवसापासून उत्सुकता ताणून धरली होती. या चित्रपटाच्या शूटिंगमागील धमाल नागराज मंजुळे आता छोट्या पडद्यावर घेऊन येत आहेत. सैराटच्या नावानं चांगभलं या कार्यक्रमातून कलाकार शूटिंगमध्ये केलेली धमाल प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. तत्पूर्वी आम्हीदेखील तुम्हाला आर्ची, प्रिन्‍स, परशा, रिंकू, लंगड्या सल्‍या आणि आनी यांचे शूटिंग सेटवरील किस्से सांगत आहोत. शूटिंगच्‍या वेळी त्‍यांच्‍याकडून काही चुकाही झाल्‍या. त्‍याचीच खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...


पुढील स्‍लाइड्सवर वाचा, शूटिंगदरम्‍यानच्‍या गंमती - जमती...

बातम्या आणखी आहेत...