आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#2YearOfSairat: पुण्याच्या झोपडपट्टीत असे झाले होते 'सैराट'चे शूटिंग, Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या 'सैराट' हा सिनेमा रिलीज होऊन (29एप्रिल) 2 वर्षे पुर्ण होत आहेत. 2 वर्षे पुर्ण होऊनही या चित्रपटाची क्रेज कमी झालेली नाही. या सिनेमाविषयीची छोट्यातील छोटी गोष्ट जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर असतात. सैराटला 2 वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला पडद्यामागचे काही क्षण दाखवणार आहोत. 

 

पुण्यातील झोपडपट्टी झाले चित्रीकरण

‘आर्ची - परशा’चा संसार ज्या हैद्राबादमधील झोपडपट्टीमध्ये सुरु होतो; ती झोपडपट्टी हैद्राबादमधील नसून पुण्याच्या ‘जनता वसाहत’ येथील असल्याचे सर्वांनाच माहिती आहे..
सिनेमाच्या उत्तरार्धात नायक-नायिका हैदराबादमध्ये दाखल होतात. येथे काही गुंड आर्ची-परशावर हल्ला करतात, तिथेच आक्का (छाया कदम) ची एन्ट्री होते आणि ती दोघांनाही आपल्या झोपडपट्टीतील घरी घेऊन येते. येथे ती आर्ची-परशाला आश्रय देते. येथूनच दोघांच्या संसाराला सुरुवात होते, असे काहीसे कथानक 'सैराट'चे आहे.

 

या सिनेमात 'आक्का' अर्थातच अभिनेत्री छाया कदमची दोन घरे दाखवण्यात आली होती. शिवाय सार्वजनिक शौचालय, घरच्यांची आठवण आल्यामुळे आर्चीने जिथून फोन केला तो पीसी... हे सर्व काही पुण्यातील 'जनता वसाहत' येथे नागराज मंजुळे यांनी चित्रीत केले होते. पुण्यातील पर्वती पायथ्यापासून ते हिंगण्यापर्यंत विस्तारलेल्या जनता वसाहतीमध्ये पोलीस चौकीपासून थोड्या अंतरावर गेल्यावर आर्ची-परशाच्या त्यांच्या खोलीच्या दिशेने टेकडीवर चढावे लागते. अरुंद गल्ली बोळांमधून चढून गेल्यानंतर अगदी वरच्या बाजुला वाघजाई मंदिर लागते. या मंदिराच्या उजव्या हाताला काही झोपड्या आहेत. झोपडपट्टीचे हे आकाशाला भिडलेले शेवटचे टोक आहे. तेथेच सिनेमात दिसणारी खोली होती.


याच पुण्याच्या झोपडपट्टीत झालेल्या 'सैराट'च्या शूटिंगची छायाचित्रे तुम्हाला या पॅकेजमध्ये बघायला मिळणार आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कसे झाले होते येथे शूटिंग...

बातम्या आणखी आहेत...