आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#2YearOfSairat: बघा शूटिंगच्या फावल्या वेळेत क्लिक झालेले \'सैराट\'च्या टीमचे फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा 'सैराट' चित्रपट रिलीज होऊन आज(29 एप्रिल)  2 वर्ष झाले आहेत. चित्रपटाने ‘सैराट’ सिनेमा आल्यानंतर आर्ची, परशा, लंगड्या, सल्या, प्रिन्स यांची क्रेझ सर्वांमध्येच पाहायला मिळाली. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, डीडीएलजे या चित्रपटांनी जसा हिंदी चित्रपटात इतिहास रचला तसाच मराठी चित्रपटसृष्टीत सैराटने केला. सैराट चित्रपटाने अगदी पहिल्या दिवसापासून उत्सुकता ताणून धरली होती. पहिला टिझर रिलीज झाल्यापासून नागराज मंजुळे आता आपल्यासाठी नवीन काय घेऊन येणार याचीच सर्वांना उत्सुकता लागलेली होती. त्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मिळालेल्या एकापेक्षा एक सुखद धक्क्यांनी सर्वांचीच उत्सुकता अधिकच ताणली, आणि अखेरच चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर घडला तो इतिहास. अजय अतुल यांचे संगीत हे या चित्रपटात फार महत्त्वाचे ठरले. अगदी पहिल्या टिझरच्या ट्यूनपासून या म्युझिकने सगळे झिंगाट झाले. त्यात नागराज मंजुळेंच्या दृष्टीतून तयार झालेला चित्रपट पाहणे हा अनुभव किती अधिक सुखद असतो हेही सर्वांनी अनुभवले.

 

आज सैराटच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने आम्ही सैराटचे पडद्यामागील खास क्षण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, पडद्यामागील 'सैराट'...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...