आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90s काळात सेक्स सिंबॉल होती ही \'रंगीला\' गर्ल, राम गोपाल वर्माने केला होता तिच्याबद्दल \'हा\' मोठा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने नुकताच तिचा 44वा वाढदिवस साजरा केला. 4 फेब्रुवारी 1974 साली मुंबईत एका मराठी कुटुंबात उर्मिलाचा जन्म झाला. लहानवयातच उर्मिलाने अभिनय करण्यास सुरुवात केली होती. मासूम या चित्रपटात पिंकीची भूमिका करणारी उर्मिला लवकरच चित्रपटात आली आणि तिच्या अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उर्मिलाने रंगीला या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू सिनेमात उतरवली आणि या विळख्यात सापडले रंगीला चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा. रंगल्या उर्मिला आणि राम गोपाल वर्माच्या अफेअर चर्चा..

 

बीटाऊनमध्ये उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली. असेही म्हटले जाते की, रामू त्यांच्या चित्रपटात केवळ उर्मिलालाच घेत असत. एकदा उर्मिलासाठी राम गोपाल वर्मा यांनी माधुरी दीक्षितलाही चित्रपटातून काढून टाकले होते. नंतर कळाले की रामू यांचे उर्मिलावर खूप प्रेम होते म्हणून त्यांनी माधुरी दीक्षितला चित्रपटांतून काढले होते. जेव्हा त्यांनी उर्मिलाला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा उर्मिलाने ती मागणी धुडकावून लावली आणि त्यांच्यासोबत चित्रपट साईन करणेही बंद केले.

 

उर्मिलाविषयी राम गोपाल वर्मा यांना जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ते उर्मिलाच्या प्रेमात असल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले "होय, मी उर्मिलाच्या सौंदर्यात रंगून गेले होते. तिचा अभिनयापासून तिची शरीरयष्ठी मला आकर्षित करत असे. केवळ उर्मिलाचे सौंदर्य कॅमेऱ्याद्वारे टिपण्यासाठीच मी रंगीला बनविला होता असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. आतापर्यंत मी काम केलेल्या अभिनेत्रींमध्ये उर्मिला सर्वा सुंदर अभिनेत्री आहे आणि कायम राहील."

इतकेच नव्हे तर उर्मिलाच्या लग्नानंतर रामू यांनी ट्वीट करुन तिचे अभिनंदन केले होते. त्यांनी लिहीले होते की, "उर्मिलाचे वैवाहीक जीवन नेहमीच रंगीलामय असो अशाच माझ्या शुभेच्छा.."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिला मातोंडकरचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...