आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेय वाघने 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या सेटवर सादर केली हृद्यस्पर्शी कविता, पाहा खास Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'डान्स महाराष्ट्र डान्स' हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेचे सर्वच रेकॉर्ड तोडत आहे.या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि त्यांचे अफलातून असे सादरीकरण डान्स च्या इतिहासात एक वेगेळेपण दाखवत आहे . डान्स महाराष्ट्र डान्स च्या कार्यक्रमामुळे अनेक उत्तम डान्सर ना मोठा व्यासपीठ मिळाला. त्यात कोणतेही बंधन नसलेला डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम इतर सर्व कार्यक्रमापेक्षा पूर्णतः वेगळा ठरत आहे. बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी युवावरील, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचे दोन स्पेशल एपिसोड शूट झाले आहेत.

 

जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते. तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांनी मिळवलेल्या यशाचा, अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक देशाने काही मार्गदर्शक तत्त्वे, कार्यक्रम निश्चित केले आहेत. डान्स महाराष्ट्र डान्स च्या व्यासपीठावर दोन स्पेशल एपिसोड हे महिला स्पर्धकांना गौरवण्यासाठी शूट केले गेले. या दोन्ही एपिसोड मध्ये केवळ महिला स्पर्धकांनी परफॉर्म केले. त्याच बरोबर अशा मातांचा गौरव करण्यात आला ज्यांनी त्यांच्या मुलींना या स्पर्धेत पाठवेल, प्रोत्सहन दिले.

या एपिसोडमध्ये अमेय वाघने महिला दिनाचे महत्व आईवर एक कविता म्हणून प्रेक्षकांना एक अनोखी भेट दिली.

 

दिनांक ८ मार्चला झी युवावरील मालिकांमधील हृता दुर्गुळे (वैदेही - फुलपाखरू) , कौमुदी वालोकर (कुहू - देवाशप्पथ), पल्लवी पाटील (निशा - बापमाणूस) आणि अश्विनी कासार (पूर्वा - कट्टी बट्टी) या अभिनेत्रींनी स्पर्धकांबरोबर धमाल केली . त्यांनी या महिला स्पर्धकांना केवळ प्रोत्साहनच नाही दिले तर त्यांनी या सर्वांबरोबर दिलखुलास डान्स सुद्धा केला. ८ आणि ९ मार्च चा डान्स महाराष्ट्र डांन्सचे हे विशेष भाग महिला स्पर्धकांचे उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्स आणि कलाकारांची विशेष भेट यामुळे आणखी अनोखा ठरणार आहे.

 

अमेयने म्हटलेली महिलांसाठीची हृद्यस्पर्शी कविता....

 

ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ 
तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय 
एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय

 

सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते 
जेवणानंतर घासायची एक डिश कमी करते
तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते
ऑफिसची कामे तरीही सांभाळते तारेवरची कसरत करते
सगळे झोपल्यानंतर कळते आता थोडे दुखताय पाय 
तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय 
एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय 

 

घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते 
अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते 
मी एव्हरेस्ट सर करतेमी लेक्टर कित्येक देते 
मी थिरकते मी बावरते मी गाते मी नाचते 
मीड जन्म देणारी, मीच जन्माला पुरणारी आणि मीच ती उरणारी
मी सृष्टी व्यापणारी, मी असल्याने तु आहेस तरी जगताना तुझे नियम आहेत
मी जे करायचे नाही त्याची यादी तु केलीस 
आई बहीण बायको मैत्रीण डोळ्यासमोर का नाही आणलीस
वेगळे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे 
तरीही आमच्याबाबत तुमचे विचार मात्र वेगळे
निसर्गाने ठेवलाय फक्त तेवढाच फरक राहु द्या 
बाकी सगळ्या बाबतीत खांद्याला खांदा हारु द्या 

सोबत असता सोबत माझ्या तुम्ही सोबती होऊन 
इकडून थोडा विचार कर मग कळेल गंमत काय 
कळेल तुलाही कळेल त्यालाही बाई होण्याची किंमत काय 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमेय वाघचा खास video...

बातम्या आणखी आहेत...