आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ohh my god... अमृताने दिवसाला ओढल्या 40 सिगारेट, गळा झाला Damaged!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट स्टारर ‘राजी’मध्ये दमदार भूमिका केल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आता डिजीटल दुनियेत पाय ठेवण्यास सज्ज झाली आहे. ‘हंगामा प्ले’च्या ‘डॅमेज’ या वेबसीरीजच्या माध्यमातून ती डिजीटल दुनियेत प्रवेश करत आहे. ‘राजी’मध्ये मुनिरा या एका पाकिस्तानी गृहिणीच्या साध्या सोज्वळ रूपात दिसलेली अमृता आता ‘डॅमेज’ या वेबसीरिजमधून बोल्ड, ब्युटिफुल आणि सेन्शुअस अशा नव्या अंदाजात दिसणार आहे.


सूत्रांनुसार, 'डॅमेज' वेबसीरिजमध्ये अमृताला लविना नावाच्या बिनधास्त आणि बोल्ड तरुणीची भूमिका साकारत आहे. या पात्राला न्याय देण्यासाठी अमृता परोपरीने प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. हेच प्रयत्न करत असताना एका सीनसाठी अमृताला सिगारेट ओढावी लागली. व्यक्तिगत आयुष्यात सिगारेटला कधीही स्पर्श न करणा-या अमृताला हा सीन करणं कठीण गेलं. सिगारेट पिण्याचा सराव करण्यासाठी अमृताने एकाच दिवशी चक्क 40 वेळा सिगारेट ओढल्या. मात्र, याचा परिणाम तिच्या घश्यावर झाला असून तिचा घसा चांगलाच बसला आहे. यामुळे तिला धड बोलताही येत नसल्याचे डॅमेज वेबसीरिजच्या युनिटकडून सांगण्यात येत आहे.


काय म्हणाली अमृता... 
‘मला सिगारेटच्या वासानेही मळमळतं. माझ्या आसपास कोणी सिगारेट ओढत असेल तर मी लगेच त्या व्यक्तिला रागावते. अशावेळी मनोरूग्ण लविनाची भूमिका रंगवताना मलाच सिगारेट ओढणं भाग होतं. सिगारेट पिणं भूमिकेचा अविभाज्य भाग असल्याने मी तयार झाले खरी, पण मला सिगारेट ओढणं जमेच ना,’ असं अमृताने सांगितलं.

 

पुढे ती म्हणाली, ‘शुटिंगदरम्यान दिग्दर्शक सारखा ओरडत होता, इनहेल कर.. पण काही ते इनहेल करून सिगारेटचा धूर व्यवस्थित सोडणं मला जमत नव्हतं. दिवसअखेरीला ते जमलं खरं. पण या फंदात एका दिवसात मी 40 सिगरेट प्यायल्या आणि माझा दूस-या दिवसापासून घसाच बसला. जवळ जवळ दोन आठवडे मला बोलता येत नव्हतं.’

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'डॅमेज' या वेब सीरिजमधील अमृताचा खास अंदाज दाखवणारी छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडवर प्रोमो...

 

बातम्या आणखी आहेत...