आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Avdhoot Wadkar In Marathi Film Love Lafade VIDEO: साऊंड रेकॉर्डिगचा जादूगार आता मोठ्या पडद्यावर, या फिल्ममध्ये झळकणार

VIDEO: साऊंड रेकॉर्डिगचा जादूगार आता मोठ्या पडद्यावर, या फिल्ममध्ये झळकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजीवासन स्टुडीओ आणि अवदुत वाडकर हे समिकरण मनोरंजन क्षेत्रात सर्वानाच माहित आहे. साऊड रेकॉर्डिस्ट म्हणून अवधूतने आतापर्यंत शेकडो सिनेमे केलेले आहेत. ७०० ते ७५० सिनेमे तर आता पर्यंत ३०० ते ३५० मराठी नाटक केले आहेत. जिंगल्स १५० ते २०० केले आहेत. टीव्ही टायटल्स ३०० पर्यंत   केले आहेत. मराठी सोबतच इतर भाषेतीलसुद्धा चित्रपट केले आहेत. त्यात दाक्षिणात्य भाषेतील २०-३० सिनेमे आहेत. त्याचप्रमाणे इतर भाषेतीलही बरेच सिनेमे अवधूतने साऊड रेकॉर्डिस्ट म्हणून केले आहेत. हे सगळं करत असताना अवदूत वाडकर आता नव्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. येत्या २१ जूनला रिलीज होणा-या “लव्ह लफडे” या चित्रपटामधून एका महत्वाच्या भूमिकेमध्ये अवधूत वाडकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच गाजलेले 'ताईच्या लग्नाला' या गाण्यामध्ये अवधूतची पहिली झलक तर सगळ्याच्या पसंतीस पडली आहे.              

 

पडद्यावर आपल्याला गाणी दिसतात किंवा गाणी आपण ऐकतो. ती गाणी श्रवणीय व्हावी यासाठी अनेकांचा हातभार लागतो. त्यातला प्रमुख असतो तो म्हणजे साऊंड रेकॉर्डिस्ट. हा तो जादूगर असतो जो आवाजातले सारे दोष काढून दर्जेदार गाणे श्रोत्यांना देतो. महाराष्ट्राला अशा साऊंड रेकॉर्डिस्टची एक परंपरा आहे. या परंपरेतील तरुण चेहरा म्हणजे अवधूत वाडकर.

 

खरंतर अभिनयाची आवड अवधूतला लहानपणापासूनच होती. कालातरांने ती आवड जास्तच वाढत गेली. संगीतक्षेत्रात असल्याने या क्षेत्रात अनेक मित्र होतेच. त्यामुळे या आवडीला मूर्त स्वरुप मिळाले. ‘मोरया’ सारख्या चित्रपटांत भूमिका छोटीशीच होती पण त्यामुळे चर्चा जास्त झाली. आता पहिल्यांदा अवधूत पूर्ण लांबीच्या भूमिकेत एका चित्रपटात दिसणार आहे. 'लव्ह लफडे' नावाचा हा चित्रपट आहे.

 

हा सिनेमा २१ जूनला एचसीसी नेटवर्क ऍपद्वारे प्रदर्शित होणार आहे. सचिन आंबात दिग्दर्शित आणि संजय मोरे लिखित हा चित्रपट आहे. अवधूत गुप्ते, प्रविण कुंवर, मंगेश बोरगावकर, रोहीत राऊत, मुग्धा कऱ्हाडे या ताज्या दमाच्या गायकांचा मंत्रमुध करणारा आवाज आहे. 'लव्ह लफडे' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये रोहित फाळके, रुचिरा जाधव, सुमेध गायकवाड, मोनिका दबडे असणार आहेत.  


पुढील स्लाईडवर बघा, 'ताईच्या लग्नाला' या गाण्याचा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...