आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी जाधव यांच्या \'न्यूड\' चित्रपटाला मिळाले A सर्टीफिकेट, हिंदी अभिनेत्री विद्या बालनची चित्रपटाला कौतुकाची थाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेला चित्रपट 'न्यूड'ला सेन्सर बोर्डाने A सर्टीफिकेट दिले आहे. न्यूड हा चित्रपट गोवा येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमधून बाहेर काढण्यात आला होता तेव्हापासून या चित्रपटाचे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. रवी जाधव यांनी सोशल मीडियावर न्यूड लवकरच प्रदर्शित होणार असल्याची बातमी दिली आहे. त्यांनी लिहीले की, Our film ‘Nude’ received an ‘A’ certificate without any cuts!!! The entire CBFC special jury team headed by Mrs. Vidya Balan gave us a standing ovation!!! Thank you everyone for your kind support

 

अनेक विवादात पडल्यानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काय होते नेमके सर्व विवाद... 

 

गोवा येथे होणाऱ्या (IFFI)आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार होते ते 'न्यूड' चित्रपटाने. पण ऐनवेळी चित्रपट निवड समितीच्या सदस्यांनी या चित्रपटाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी याबद्दल खेद व्यक्त केला. मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडेची मूख्य भूमिका असलेला चित्रपट 'एस दुर्गा'ही महोत्सवातून काढून टाकण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. 'न्यूड'चे दिग्दर्शक रवी जाधव यांनी न्यायासाठी कोर्टाचे दार ठोठावले होते आणि यावेळी सर्व मराठी चित्रपटसृष्टी रवी जाधव यांच्या बाजूने उभी राहिली होती. 

 

हे प्रकरण घडते न घडते तोच 'न्यूड' अजून एका वादात अडकला पण यावेळी प्रदर्शनाचे नव्हे तर चित्रपटाच्या कथेवरुन वादंग निर्माण झाला. हिंदी लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप दिग्दर्शक रवी जाधव यांच्यावर केला. रवी जाधव यांनी त्यांच्या 'न्यूड' या चित्रपटातून न्यूड मॉडेलिंग करणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. अशाच प्रकारची कथा मनिषा यांनी त्यांच्या 'कालिंदी' या लघुकथेच आहे असे सांगितले आहे. या चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही मनिषाने दिला होता.

 

लेखिका मनिषा यांनी सांगितले की, "मी रवी जाधव यांच्याशी अगोदरच संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण टीझर पाहिल्यानंतर ही माझीच लघुकथा असल्याचे मला कळाले आहे. लेखकांना पैसे किंवा सौजन्य देण्याची वृत्ती नसल्याने आता या विरोधात कोर्टात जाईल' असा इशाराही त्यांनी दिला होता." पण आता या दोन्ही वादावर पडदा पडत चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. कोणत्याही कटशिवाय हा चित्रपट लवकरच 'ए' सर्टीफिक्टसह प्रदर्शित होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटाचे काही फोटोज् आणि टीझरही....

बातम्या आणखी आहेत...