आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 'लागिरं...'मध्ये असा शूट झाला फाइट सिक्वेन्स, गुंडाना धूळ चारणार अज्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागिरं झालं जी' या मालिकेत सोमवारच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा ट्वीस्ट बघायला मिळणार आहे. अलीकडच्या भागात अजिंक्यने शीतलला लग्नाची मागणी घातली असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. त्यांच्या नात्याविषयी जेव्हा हर्षवर्धन अर्थातच भैय्यासाहेबाला कळते तेव्हा गोष्टी वेगळ्याच थराला जाऊन पोचतात. हर्षवर्धनचे शीतलवरील एकतर्फी प्रेम असल्यामुळे जेव्हा त्याला शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळते, तेव्हा त्याचा राग अनावर होतो. हर्षवर्धन अजिंक्यला मारण्यासाठी गुंड पाठवतो. 

 

फाइट सीनच्या शूटिंगचा व्हिडिओ केला रिलीज...
अजिंक्य आणि भैय्यासाहेबाने  पाठवलेल्या गुंडामधील फाइट सिक्वेन्स नेमका कसा चित्रीत करण्यात आला, हे दाखवणारा व्हिडिओ नुकताच झी मराठी वाहिनीच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. गुंड आणि अजिंक्य यांच्यातील फाइट सीन हा कुशल फाइट मास्टर्स आणि अद्ययावर यंत्रणा वापरुन शूट करण्यात आला आहे. 

 

फाइट सीन शूट करताना जखमी झाला नितिश चव्हाण..

या मालिकेत अभिनेता नितिश चव्हाण अजिंक्यची भूमिका साकारतोय. हर्षवर्धन अर्थातच भैय्यासाहेबाने पाठवलेल्या गुंडांशी अजिंक्य दोन हात करताना दिसणार आहे. मार्शल आर्टमध्ये एक्स्पर्टस असलेल्या विकास आणि राकेश या फाईट मास्टर्सच्या देखरेखीखाली हा फाइट सिक्वेन्स चित्रीत करण्यात आला आहे आणि त्यांनी अजिंक्याला या सिक्वेन्ससाठी योग्य प्रशिक्षण दिले आहे. फाईट सिक्वेन्स शूट करताना अजिंक्यला अनेक ठिकाणी खरचटले, पण तरीही त्याने दुखापतीकडे लक्ष न देता मोठ्या जिद्दीने पहाटे 4 वाजेपर्यंत फाईट सिक्वेन्सचे चित्रीकरण पूर्ण केले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, फाइट सिक्वेन्स शूट करतानाची शूटिंग सेटवरील निवडक छायाचित्रे....