आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, तुमची बकेट लिस्ट काय?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क :  हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित कधी मराठी चित्रपटात पदार्पण कधी करणार याची उत्सुक्ता तिच्या चाहत्यांना अनेक वर्षापासून होती. आता चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे आणि अखेर माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. ट्रेलरमध्ये माधुरी मराठमोळ्या अवतारात दिसतेय. 'धर्मा प्रोडक्शन'  'बकेट लिस्ट' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या निमित्ताने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे नाव पहिल्यांदाच मराठी चित्रपटाशी जोडले गेलेय.

 

गृहिणीची भूमिका साकारणार माधुरी
या चित्रपटात माधुरी एका साध्या भोळ्या गृहिणीच्या भूमिकेत दिसतेय. चित्रपटाच्या कथेत सई नावाच्या एका वीस वर्षीय मुलीची कथा आहे. हृदयदान केलेल्या या तरुणीच्या अपर्ण इच्छा पुर्ण करण्याचा निर्धार माधुरी घेते. यावरच हा चित्रपट आधारलेला आहे. चित्रपाटच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरची झलकही पाहायला मिळते. यामध्ये रणबीर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.


- हा चित्रपट 25 मेला प्रदर्शित होणार आहे. ‘बकेट लिस्ट… माझी, तुमची… आपल्या सगळ्यांची,’ 
- 'बकेट लिस्ट' म्हणजे आपल्या इच्छा, आकांक्षांची लिस्ट असे यामध्ये दाखवण्यात आलेय.
- या चित्रपटात माधुरी दिक्षित सोबतच रेणूका शहाणेदेखील आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'बकेट लिस्ट' चा ट्रेलर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...