आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक पाळीवर भाष्य करणारी Web Series 'माहवारी', अश्विनीला मिळाली भाग्यशालीची साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री  अश्विनी महांगडे आणि तिची मैत्रीण भाग्यशाली राऊत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आल्या आहेत एक खास वेबसीरिज. महिलांच्या मासिक पाळीवर भाष्य करणारी 'माहवारी' हे त्यांच्या वेबसीरिजचे शीर्षक असून त्याचा पहिला एपिसोड 28 मे रोजी रिलीज करण्यात आला आहे.  


मैत्रिणी आहेत अश्विनी आणि भाग्यशाली...
अश्विनी आणि भाग्यशाली यांनी मोरया प्रॉडक्शन आणि अंशुल प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमानाने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. मासिक पाळी या विषयावर वेबसीरिज बनवावी, अशी कल्पना भाग्यशालीला सुचली आणि त्यानंतर या दोघींनी मिळून घरातील महिलांशी म्हणजेच त्यांच्या आई, आजी, बहिणींशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेबसीरिजमधून सत्य घटना दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन अश्विनीचे असून लेखन आणि संवाद भाग्याशीलचे आहे. तर मंगेश जगदाळे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पाड पाडली. संकलन अविनाश साळवे यांनी केले आहे. या वेबसीरिजच्या तीन कथांचे चित्रीकरण वाईशेजारील गाव पसरणी येथे झाले आहे. माहवारी या विषयावर दहा ते पंधरा एपिसोड बनवण्याचा मानस अश्विनी आणि भाग्यशाली यांनी व्यक्त केला आहे. 


काय आहे 'माहवारी'च्या पहिल्या एपिसोडची वनलाइन... 
सुमी नावाच्या नुकत्याच वयात आलेल्या एका मुलीची कथा या वेबसीरिजमध्ये मांडण्याच आली आहे. गावात राहणा-या सुमीला पीरियड्स म्हणजे काय? हे देखील समजत नसतं. लग्न झालेल्या बहिणीकडे सुमी पाहुणचारासाठी येते. पण आपल्या धाकट्या बहिणीला मासिक पाळी सुरु असून तिच्या या इटाळाविषयी सासूला कळले, तर काय होईल या भीतीपोटी लग्न झालेली बहीण सुमीला आल्या पावली परत पाठवते. "इटाळ" (माहवारी) हा खरंच इतका घातक आहे की सुमीचे बालपण तिच्यापासून हिरावुन घेतो? याचे उत्तर या वेबसीरिजच्या दुस-या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे.  

 

पुढील स्लाईडवर बघा, 'माहवारी'च्या पहिल्या एपिसोडची खास झलक...

बातम्या आणखी आहेत...