आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 Divas: शशांक-मयुरीचे मन हे असे... साँग रिलीज, 'बाहुबली'तील या धबधब्यावर झाले शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून शशांक केतकर आणि 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख आता रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. निमित्त आहे आगामी '31 दिवस' या चित्रपटाचे. नुकतेच या चित्रपटातील या दोघांवर चित्रीत झालेले 'मन का असे...' हे रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. 


केरळमधील प्रसिद्ध धबधब्यावर झाले गाणे शूट...
केरळमधील सर्वात प्रसिद्ध धबधबा म्हणजे अथिरापल्ली. 'बाहुबली द बिगनिंग' या चित्रपटातील 'खोया है..' गाण्यातून याच धबधब्याने सर्वांना भूरळ पाडली. विशेष म्हणजे या धबधब्यावर 31 दिवस या चित्रपटातील 'मन का असे...' या गाण्याच्या चित्रीकरण झाले. या गाण्याला चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे. 

 

शेवटच्या स्लाईडवर बघा, '31 दिवस' या चित्रपटातील 'मन का असे...' या गाण्याचा व्हिडिओ...  

बातम्या आणखी आहेत...