आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडलीय ठिणगी, लागलीय आग! न्यूकमर नेहाच्या अदांनी घायाळ करतो 'शिकारी'चा Teaser

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंटस डेस्क - मराठीतील आतापर्यंतचा सर्वात बोल्ड चित्रपट शिकारीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नेहा खान ही मॉडेल प्रथमच मराठी चित्रपटात तिच्या अदांनी सर्वांना घायाळ करणार आहे.

 

नेहाचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले असता तीने मराठीअगोदर हिंदी तसेच मल्याळम चित्रपटात काम केले आहे. नेहाचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले असता तीने शाहरुख खानसोबतही एका कमर्शिअलमध्ये काम केल्याचे समजते.

 

नेहा खानसह 'शिकारी' या मराठी चित्रपटात काश्मिरा शाह, प्रसाद ओक, सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे आणि भाऊ कदम यांच्या भूमिका असल्याचे समजते. या चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. हा चित्रपट येत्या 20 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'शिकारी' या चित्रपटाचा टीझर...

बातम्या आणखी आहेत...