आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Film 31 Divas Music Launch शशांक मयुरीच्या \'31 दिवस\'चे म्युझिक लाँच, पहिले साँग रिलीज

Music Launch: शशांक-मयुरीच्या \'31 दिवस\'चे म्युझिक लाँच, पहिले साँग झाले रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून शशांक केतकर आणि 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख आता रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. निमित्त आहे आगामी '31 दिवस' या चित्रपटाचे. गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचे म्युझिक लाँच करण्यात आले. चित्रपटात एकुण चार गाणी असून चिनार - महेश याचे संगीतकार आहेत. शशांक आणि मयुरी यांच्यासोबत रिना अग्रवाल हिचीदेखील महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे.

 

म्युझिक लाँच सोहळ्याला मयुरी आणि रिना यांचा ग्लॅमरस लूक लक्षवेधी ठरला. तर शशांकदेखील नेहमीप्रमाणे हॅण्डसम दिसला. म्युझिक लाँचसोबतच चित्रपटातील पहिलेवहिले गाणेदेखील सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. 'हाय फाय लगीन सराई... ' हे बोल असलेले हळदी स्पेशल गाणे आहे. गाण्यात शशांक आणि मयुरी एकत्र थिरकताना दिसत आहेत. 

 

 

असामान्य, जिद्दीनं पेटलेल्या मकरंद नावाच्या तरुणाची गोष्ट 31 दिवस या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. शशांक चित्रपटात मकरंद ही व्यक्तिरेखा साकारतोय. तर मयुरीच्या व्यक्तिरेखेचे नाव मुग्धा असून रिना मीराची व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारत आहे. येत्या 20 जुलै रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. 

 

दुस-या स्लाईडवर बघा, चित्रपटातील पहिल्या-वहिल्या गाण्याचा व्हिडिओ आणि तिस-या स्लाईड्पाससून म्युझिक लाँच सोहळ्याची छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...