आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगा वेगळी \'अंतयात्रा\' करणार सुशिक्षित बेकारीवर भाष्य, बघा भाऊ कदमच्या फिल्मचा Trailer

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशाला विकसित देशांच्या यादीत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याचवेळी सुशिक्षित बेकारांची समस्याची निर्माण झाली आहे. या समस्येवर मनोरंजनाच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न "जगा वेगळी अंतयात्रा" या चित्रपटातून करण्यात आलं आहे. हा चित्रपट 23 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

 

डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा.ली. या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमोल लहांडे यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता भाऊ कदम, माधव अभ्यंकर, राजन भिसे, सुहास परांजपे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसह सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे या नव्या दमाच्या कलाकारांनी चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत. रोहन रोहन या आजच्या पिढीच्या संगीतकारद्वयीनं चित्रपटाचं संगीत केलं आहे. चित्रपटाचं शीर्षक जरी गंभीर वाटलं, तरी हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार आहे. 

 

पुढे वाचा, काय आहे चित्रपटाचे कथानक आणि शेवटच्या स्लाईडवर बघा ट्रेलर...

बातम्या आणखी आहेत...