आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमंत्र-सम्राज टॉकीजच्या \'माझा अगडबम\'ची रिलीज डेट ठरली, 6 जुलैला भेटीला येतेय \'नाजुका\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सिनेमंत्र’ प्रॉडक्शनने नुकतीच ‘सम्राज टॉकीज’ या नव्या उद्यमाची घोषणा केली आहे. मनोरंजन, सर्जनशीलता आणि कला यांसारख्या क्षेत्रात मराठी साहित्याचे दर्जेदार प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे सम्राज टॉकीजचे मूळ उद्दीष्ट असून, त्या दिशेने पहिले पाउल उचलत सिनेमंत्र आणि सम्राज टॉकीज 6 जुलै, 2018 रोजी ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करित आहेत. 

 

रितेश देशमुखच्या 'लई भारी' सारखी दमदार व उत्तम कलाकृती देणाऱ्या, शालिनी ठाकरे यांनी ‘सम्राज टॉकीज’ विषयी बोलताना सांगितले, “सम्राज टॉकीजमागील मूळ कल्पना ही दर्जेदार मराठी साहित्याला प्रोत्साहन देणे आहे जे उत्तम प्रकाशना-अभावी हरवत चालले आहे. प्रेक्षकांमध्ये अशा प्रदर्शित कलाकृतींबाबत जागरूकता निर्माण करणे हाच सम्राज टॉकीज मागील अनोखा विचार आहे.”

 

दमदार स्टारकास्ट... 

या चित्रपटात  गृहिणीची भूमिका साकारत तृप्ती भोईर व तिच्या पतीची भूमिकेत सुबोध भावे आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना एका सुखद आणि भावनिक सफारीचा अनुभव हे कलाकार देतील.

 ही कथा आपणास एक मुलगी, सून, व बायको म्हणून तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षांना पतीच्या पाठींब्यासह सामोरी जाणाऱ्या नायिकेच्या विविध अडचणी आणि विनोदाची सफर घडविते.  ‘माझा अगडबम ‘ चित्रपटात तृप्ती भोईर, सुबोध भावे यांच्यासह उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, तानाजी गलगुंडे आणि डॉ. विलास उझवणे अशा दमदार कलाकारांची फळी असून खुद्द तृप्ती भोईरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.  

 

तिहेरी भूमिकेत तृप्ती भोईर... 
निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशा तिहेरी भूमिकेतून तृप्ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  रेसलिंगच्या रिंगमध्ये WWF चॅम्पिअन आणि नाजुका यांच्यातील दमदार सामना प्रेक्षकांना या चित्रपटात बघता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यातील नाजुकाचा हटके अंदाज लक्ष वेधून घेतोय. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने नाजुकाच्या पतीची भूमिका वठवली आहे.  


पुढे वाचा, तृप्तीसाठी कठीण होता नाजुका होण्याचा प्रवास... 

बातम्या आणखी आहेत...