आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Trailer:ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा आहे 'वंटास', झळकणार दोन नवीन चेहरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वंटास या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातलं "टिपूर टिपूर...." हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं असून, ४ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

गुरूकृपा प्रॉडक्शन एंटरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. वंटास ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची... उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करामती कराव्या लागतात, याची ही 'वंटास' गोष्ट आहे. अजय वरपे, स्नेहल साळुंखे, अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक, मृणालिनी रानावरे , मनमोहन माहिमकर, प्रदीप नवले हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. सुदर्शन महामुनी यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लेखन केलं आहे. हरीश राऊत आणि ज्ञानेश्वर उमक यांनी पटकथा लिहिली आहे. वलय आणि सुदर्शन महामुनी यांनी लिहिलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. शैलेश जाधव यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन जागेश्वर ढोबळे यांचे आहे तर कार्यकारी निर्माता म्हणून शैलेंद्र पवार यांनी काम पाहिले आहे.

 

'वेगळ्या पद्धतीनं ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा "वंटास" या चित्रपटातून मांडली आहे. चित्रपट निर्मितीचा आमचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. आमचा हा प्रयत्न आणि चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,' असं निर्माता अमोल बापूराव लवटे यांनी सांगितलं. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, वंटास चित्रपटाचा ट्रेलर आणि कलाकारांचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...