आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कप साँगमुळे जगभरात फेमस झाली ही मराठी अभिनेत्री,आता फोर्ब्सच्या 30under30 मध्ये आले नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मिथीला पालकर हे नाव आले तर डोळ्यासमोर येते सुंदर हास्याची नाजुक तरुणी आणि तिचे कप साँग. मिथीलाचा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवास फारच वेगळ्या पद्धतीने सुरु झाला होता. मिथीलाने युट्युबवर 2016 साली 'तुझी चाल तुरु तुरु' हे मराठी गाणे एका इंग्रजी गाण्याच्या चालीने कप साँगद्वारे प्रेक्षकांसमोर आणले आणि काही दिवसांतच अख्ख्या जगभरातून तिच्या या गाण्यावर लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. ही तरुणी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता आणि काही दिवसांतच मिथीला एक एका वेब सीरीजद्वारे लोकांसमोर आलीही. या वेबसीरीजला तरुणांचे प्रचंड प्रेम मिळाले आणि आता ही मराठी तरुणी मराठीत कधी दिसणार असा विचार आपण करतो न करतो तोच मिथीलाने बनवलेला गोड मुरांब्याची चव आपल्याला चाखायलाही मिळाली. बेव सीरीज, मराठी चित्रपटानंतर आता मिथीलाने थेट हिंदी चित्रपटांपर्यंत मजल मारली आहे. इरफान खानसोबत मिथीला आगामी सिनेमात झळकणारही आहे.

 

आता हे सर्व सांगायचे कारण असे की, मिथीलाचे हे यश आता फक्त देशापुरतेच मर्यादीत राहिले नसून तिने आंतरराष्ट्रीय मासिकालाही तिच्या कामाची दखल घेण्यास भाग पाडले आहे. फोर्ब्सच्या 30 अंडर 30 लिस्टमध्ये मिथीला पालकर हे नाव आले आहे आणि तिच्या या कामगिरीमुळे तिचे सर्वच चाहते आनंदात आहेत. वयाच्या पंसविशीतच मिथीलाला मिळालेल्या या यशाने ती सर्वच तरुणाईची आयडॉल बनली आहे. 

 

मिथीला तिच्या कुरळ्या केसांमुळेही फार लोकप्रिय झाली. तिच्या या कुरळ्या केसांबद्दल अनेकजण तिची थट्टाही करताता पण हेच कुरळे केस आज तिच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिथीलाचे  काही खास PHOTOs आणि शेवटच्या स्लाईडवर कप साँग VIDEO

बातम्या आणखी आहेत...