आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘Once मोअर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, प्रेक्षकांमध्ये वाढले कुतुहल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. प्रेक्षकवर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांचे चांगलं स्वागत होत आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. सोशल साईट्सवर या पोस्टरला चांगला प्रतिसाद मिळतोय.

 

एखादी गोष्ट आवडल्यानंतर त्याला ‘वन्स मोअर’ची दाद हमखास मिळते. पण ‘Once मोअर’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा शोध दिसून येतोय. या शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखेमुळे या चित्रपटात नक्की काय असावे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली आहे. 'चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटात ‘कुछ हटके’ आहे असे तुम्हाला वाटेल. हा शोध नेमका कशाचा आहे? शोध घेणारी ती व्यक्ती कोण? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटातून कोणता विषय हाताळण्यात येणार आहे ? या सगळ्या गोष्टींवरून लवकरच पडदा उठणार आहे. 

 

या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे. धनश्री विनोद पाटील, देवस्व प्रोडक्शन या चित्रपटाचे निर्माते आहेत. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय सिंग यांनी सांभाळली आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा, Once मोअर चित्रपटाचे मोशन पोस्टर...

बातम्या आणखी आहेत...