आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षे डेटींग केल्यानंतर थाटला 'रमा-माधव' यांनी खराखुरा संसार, विधी न करता असे पार पडले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'रमा माधव' या चित्रपटातून रमाची लोकप्रिय भूमिका करणारी पर्ण पेठे आज तिचा 28वा वाढदिवस साजरा करत आहे. मुळची पुण्याची असलेल्या पर्णला या चित्रपटाच्या निमित्ताने तिचा रिअल लाईफ माधवही भेटला तो म्हणजे आलोक राजवाडे. आलोकने या चित्रपटात माधवची भूमिका केली होती. चित्रपटात पती-पत्नी बनलेल्या रमा-माधव यांचे खऱ्या आयुष्यातही जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

 

पर्ण आणि आलोक चित्रपटाअगोदरही करत होते डेटिंग..
पर्ण आणि आलोक हे दोघेही अभिनेता अमेय वाघचे चांगले मित्र. अमेयने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल काही खुलासा केला होता. त्याने सांगितले की कॉलेजमध्ये असतानापासून आम्ही नाटकाचे प्रयोग करत असू आणि त्यानिमित्त बराच प्रवासही होत असे. या प्रवासादरम्यान पर्ण-आलोकची जवळीकी आम्ही पाहत असू आणि ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे सर्वांनाच माहिती होते. आमच्या ग्रुपमधील सर्वचजण या लग्नाची फार दिवसांपासून वाट पाहत होतो असे तो म्हणाला. 

 

पर्ण-आलोकचे झाले कोर्ट मॅरेज...
कोणत्याही प्रकारचे विधी न करता आलोक-पर्ण यांनी कुटुंबीय आणि मित्रमैत्रीणींसमोर कोर्ट मॅरेज केले. फार गाजावाजा न करता साधेपणाने या दोघांनी लग्न केले. लग्नाच्या दिवशी पर्णने लाल रंगाची साऊथ पॅटर्नची साडी आणि दागिने घातले होते तर आलोकने साधा कुर्ता-पायजमा आणि त्यावर नेहरु कोट अशी वेशभुषा केली होती.  


इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांची लग्नाला उपस्थिती..
पर्ण-आलोक यांनी पुण्यातील एका मंगल कार्यालयामध्ये लग्न केले. या लग्नाला सुयश टिळक, जितेंद्र जोशी, निपूण धर्माधिकारी, अमेय वाघ, गायिका सावनी रविंद्र यांनी उपस्थिती लावली होती.पर्ण-आलोक यांनी त्यांच्या लग्नात धम्माल डान्सही केला होता. त्यांच्या या लग्नाचा व्हिडिओही खास पर्णच्या वाढदिवसानिमित्त तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, पर्ण-आलोकच्या लग्नाचे काही खास फोटोज् आणि त्यांचा खास व्हिडिओ शेवटच्या स्लाईडवर...

बातम्या आणखी आहेत...