आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रणांगण\'मध्ये स्वप्निलचा डॅशिंग अंदाज, भिडणार सचिन पिळगावकरांसोबत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार स्वप्निल जोशीचा आगामी खलनायिकी अंदाज प्रथमच प्रेक्षकांना 'रणांगण' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

 

आपल्या हक्कांची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेल्या युवकाची कथा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स यांनी मांडली असून या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं आहे.

 

रणांगणात सचिन पिळगांवकरांसमोर स्वप्नील जोशी असणार आहे. त्याच बरोबर सुचित्रा बांदेकर, सिध्दार्थ चांदेकर, आनंद इंगळे, प्रणाली घोगरे आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 52 विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स्) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर अर्जुन सिंहबर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'रणांगण' चित्रपटाचे ट्रेलर...

बातम्या आणखी आहेत...