आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी जाधव करताय सेलिब्रेशनची तयारी तर नागराज म्हणाले \'राष्ट्रीय पुरस्काराची नव्हती अपेक्षा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपट 'कच्चा लिंबू'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामुळे कच्चा लिंबूची संपूर्ण टीम फारच आनंदात आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक रवी जाधव अभिनयक्षेत्रात उतरले होते आणि त्यांनी त्यांच्या भूमिकेला उत्तम न्यायही दिला आणि या चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. या यशाबद्दल रवी जाधव यांनी त्यांच्या भावना सर्वांसोबत शेअर केल्या. काय म्हणाले रवी जाधव...

 

चित्रपटातील अभिनेते रवी जाधव यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की मी चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आता आम्ही सेलिब्रेशनची तयारी करणार आहोत. हाताळायला अतिशय अवघड विषय असलेला हा चित्रपट प्रसाद ओकने अगदी लीलया पेलला. रवी जाधव यांनी सांगितले की, हा माझा सहावा चित्रपट आहे ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मी आणि माझी टीम आता सेलिब्रेशन करणार आहोत.

 

तर नागराज मंजुळे यांची शॉर्टफिल्म पावसाचा निबंधलाही विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या सन्मानाबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले की, निश्चितच फार आनंद होत आहे. पावसाचा निबंध या विषयावर मी आणि माझी टीम पाच वर्षापूर्वी काम करत होतो पण काही कारणाने त्याचे काम थांबले होते पण टीमच्या आग्रहाने मी याचे काम पुन्हा सुरु केले. मी या शॉर्टफिल्मला पुरस्कार मिळले अशी अपेक्षा केली नव्हती पण आता याद्वारे मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल असे वाटते. काहीच दिवसांपूर्वी युट्युबवर पावसाचा निबंध शॉर्टफिल्मचे टीझर रिलीज झाले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रवी जाधव यांच्या कच्चा लिंबू आणि पावसाचा निबंधचे ट्रेलर आणि टीझर..

बातम्या आणखी आहेत...