आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 फेब्रुवारीला उघडणार आहे स्वैपाकघराची खिडकी... बघा चविष्ठ \'गुलाबजाम\'चा Trailer

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पंगतीची तयारी बघण्यासाठी आज उघडलीय स्वयंपाकघराची खिडकी. बघा कशी चाललीय तयारी आणि 16 फेब्रुवारीला पंगतीला नक्की या.. वाट बघतोय !’,  असे म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आगामी ‘गुलाबजाम’ या चित्रपटाचा ट्रेलर तिच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. झी स्टुडिओज निर्मित आणि सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘गुलाबजाम’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मेन लीडमध्ये आहे.  सोनाली कुलकर्णीने राधा तर सिद्धार्थने आदित्य हे पात्र या चित्रपटात वठवले आहे. 

 

ही आहे चित्रपटाची वनलाइन... 
लंडनहून भारतीय खासकरुन महाराष्ट्रीय पदार्थ शिकण्यासाठी भारतात आलेल्या आदित्य आणि त्याला स्वयंपाक शिकवणारी गुरु राधाची ही कथा आहे. ‘मी तुमचं स्वयंपाकावरचं पुस्तक वाचलं’ असे म्हणणाऱ्या आदित्यला एक आजी ‘कशाला? बाईलवेडी कामं..’ असं म्हणून एकप्रकारे पुरुषांनी स्वयंपाकघरात जाऊ नये असेच काहीसे सांगतात. आदित्यला स्वत:चे रेस्तराँ सुरु करायचे असते. त्यासाठी त्याला उत्तम असा स्वयंपाक करणाऱ्या गुरुची गरज असते. गुरुच्या शोधात असलेल्या आदित्यला एकदा स्वतःला राधाच्या हातचे गुलाबजाम खाण्याची संधी मिळते. त्याचवेळी तो राधाला आपला गुरु बनवण्याचा निश्चय करतो. पण राधा आदित्यला स्वयंपाक शिकवणार का? त्याला राधाप्रमाणे गुलाबजाम, करंज्या असे चविष्ट पदार्थ करायला जमतील का? या प्रश्नांची उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

 

चला तर मग बघुयात 16 फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होण्यास सज्ज झालेल्या चविष्ठ 'गुलाबजाम'चा ट्रेलर...

बातम्या आणखी आहेत...