आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Poster Out : आजोबा आणि नातवाची एक सुरेल कथा आहे 'पुष्पक विमान', ही आहे फिल्मची टीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा नव्या कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'पुष्पक विमान' हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरवर सुबोध भावे आणि अभिनेते मोहन जोशी यांची झलक बघायला मिळत आहे. चित्रपटात मनोज जोशी आणि सुबोध भावे यांनी आजोबा-नातूची भूमिका वठवली आहे. अलीकडेच या चित्रपटाचा  41 सेकंदांचा टिझरही रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट आजोबा-नातू नातेसंबंधांवर आधारित असून येत्या 3 ऑगस्टला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

 

ही आहे चित्रपटाची टीम... 
सुबोध भावे हा एक प्रतिभाशाली कलावंत असल्याचे त्याने 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली' यांसारख्या चित्रपटांद्वारे सिद्ध केले आहे. तो केवळ चांगला कलाकारच नाही तर दिग्दर्शकदेखील आहे. आता पुष्पक विमान या चित्रपटाच्या माध्यमातून सुबोध पटकथा लेखक म्हणून आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची पटकथा सुबोधची आहे. तर त्याचा जवळचा मित्र वैभव चिंचाळकर या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात श्रीगणेशा करतोय. इतकेच नाही तर सुबोधची पत्नी मंजिरी सुबोध भावे ही या चित्रपटाची निर्माती आहे. गौरी महाजन ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करतेय.  

 

शेवटच्या स्लाईड्सवर बघा, 'पुष्पक विमान' या चित्रपटाचा टीजर... 

बातम्या आणखी आहेत...