आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात पहिल्यांदाच थिएटरमध्ये 'ऑडिओ -शो'चा प्रीमियर, हे मराठी Celebs राहणार हजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑडिओ बुक्स आणि श्राव्य माध्यमात आपला वेगळा ठसा उमटवणारे स्नॉवेल आता आपल्यापुढे "ती​ ​परत येईल ?" ह्या रोमांचक गूढ गोष्टीसह एका नाविन्यपूर्ण पद्धतीने येत आहे! डॉ. गिरीश ओक यांच्या आवाजात, शिरीष देखणे यांचीही कथा अंजली कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केली ​​आहे. ध्वनी या माध्यमात विलक्षण ताकद   आहे. आजकाल लोकांना नुसतं ध्वनी माध्यमातून खिळवून ठेवणं आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणं निश्चितच एक आव्हान आहे. स्नॉवेल सातत्याने या क्षेत्रात नवीन मैलाचे दगड उभे करत आले आहेत.  ​

 

स्नॉवेलने, भारतात कदाचित सर्वप्रथम, थिएटरमध्ये 'ऑडिओ -शो' चा प्रीमियर योजून एका आगळ्या वेगळ्या 'प्रयोगाचा' पायंडाच पाडला आहे! पुण्यातील यशस्वी प्रतिसादानंतर मुंबईत हा प्रयोग होणार आहे. थिएटरसारख्या वातावरणात डोळे बंद करून साउंड इफेक्टसह गोष्ट अनुभवण्याची संधी रसिक श्रोत्यांना एक विलक्षण अनुभव देणारी असेल याची खात्री आहे.   ​ 

ही कथा खास श्राव्य माध्यमासाठी लिहिली आहे. दुसऱ्या महायुद्धातल्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट अनपेक्षित वळणं घेत प्रत्येक मिनिटागणिक उत्कंठावर्धक बनते आणि आपल्याला खिळवून ठेवते. 

 

येत्या २६ मे रोजी मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजीपार्क, दादर येथे संध्याकाळी ७.३० वाजता हा ऑडिओ शो प्रीमिअर पार पडणार आहे.  अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेते भरत जाधव, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी लेखक-अभिनेते अजित भुरे, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, लेखक क्षितिज पटवर्धन यांची खास उपस्थिती या कार्यक्रमाला असेल. 

बातम्या आणखी आहेत...