आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : माधुरीच्या वाढदिवसानिमित्त 'बकेट लिस्ट'चं 'तू परी' हे रोमँटिक गाणं रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटातील "होऊन जाऊ द्या!" या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चित्रपटातील रोमँटिक असं 'तू परी' हे दुसरं गाणं आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. 

 
'बकेट लिस्ट' चित्रपटातील पहिल्या गाण्यात सर्व कलाकारांनी धरलेला नृत्याचा ताल आपल्या आकांक्षांना उजाळा देणारा ठरला. आता 'बकेट लिस्ट' चित्रपटातील  'तू परी' या गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत.

 

लाखो-करोडो लोकांच्या स्वप्नातील परी अर्थातच माधुरी दीक्षित आणि अभिनय असो, संगीत असो वा नृत्य असो आपल्या प्रत्येक कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडणारा अभिनेता सुमित राघवन ही चित्तवेधक जोडी या रोमँटिक अशा गाण्यातून आपणांसमोर येणार आहे. हे गाणं पाहताना जणू परी कथेतील परी स्वर्गातून लंकावी मध्ये अवतरली असल्याचा भास होतो.


माधुरीच्या वाढदिवसानिमित्त 'बकेट लिस्ट' चित्रपटातील प्रसारित करण्यात येणार 'तू परी' हे गाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावं लागेल.

 

पुढे वाचा, काय आहे या गाण्याचे वैशिष्ट्य...

बातम्या आणखी आहेत...