आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आगामी सिनेमा 'सायकल' आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझरही नुकताच रिलीज झाला आहे. हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम यांच्या भूमिका असलेला हा सायकलचा टीझर 'आपला मानूस' सोबत थिएटरमध्ये झळकला. या टीझरला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावतीही मिळत आहे. व्हायकॉम18 मोशन पिक्चर्स सादर करत असलेला 'सायकल' हा सिनेमा निर्मिती हॅपी माइंड एंटरटेनमेंटने यांनी केली आहे आ आणि त्यात सहयोगी आहेत एमएफए व थिंक व्हाय नॉट.
सायकल - किंवा जाऊ देण्याचा गुण, आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडातील भारतातील एका छोट्या खेड्यात हा सिनेमा घेऊन जातो, जे कोकणात आहे. हा हलकाफुलका सिनेमा एका विशेष कथेवरून तयार झाला आहे जेथे प्रमुख पात्र केशवचे त्याच्या सायकलवर अतिशय प्रेम आहे. या सिनेमाच्या लेखिका आहेत अदिती मोघे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, आगामी चित्रपट 'सायकल'चा Teaser....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.