आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिलाची 'छकुली' जीजा अशी शिकतेय आईसोबत स्विमींग, तुम्ही पाहिलात का हा क्युट VIDEO?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उर्मिला कोठारे नुकतीच आई झाली आहे. उर्मिलाने 18 जानेवारी रोजी मुलील्या जन्म दिल्याची बातमीने तिच्या फॅन्सच्या आनंदावर पारावर उरला नव्हता. आता आई झाल्यानंतर उर्मिला संपू्र्णपणे तिच्या मुलीच्या देखभालीकडे लक्ष देत आहे. उर्मिलाने तिच्या लाडक्या मुलीचे नाव जीजा असे ठेवले आहे आणि आता सर्वांची लाडकी जीजा अडीच महिन्यांची झाली आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट उर्मिला आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

 

नुकताच उर्मिलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात उर्मिला चिमुकल्या जीजाला स्विमींग शिकववत आहे. या व्हिडिओमध्ये उर्मिलाबरोबर एक ट्रेनरही दिसत आहे. यात जीजा अजिबात न रडता आनंदाने स्विमींगचे धडे गिरवत आहे. जीजाचे बारसे नुकतेच पार पडले आहे आणि अगदी थाटामाटात झालेल्या या बारश्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चिमुकली जीजाचा स्विमींग करतानाचा फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...