आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आपला माणूस\'चा येणार सिक्वेल, हिंदीतही होणार रिमेक, नायिका म्हणून ही लोकप्रिय अभिनेत्री झळकणार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेनमेंट डेस्क - नुकताच रिलीज झालेला 'आपला माणूस' या मराठी चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडेच करणार असल्याची बातमी मिळत आहे. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला आपला माणूस या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते आणि त्यांनी कमाईही चांगली केली होती. आता या सीक्वलमध्ये नेमके काय असणार आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार याची माहिती अजून समोर आलेली नाही. 
 
'आपला माणूस'चा हिंदीतही येणार रिमेक..
'आपला माणूस' चित्रपटाचा आता हिंदी रिमेक येणार आहे. या चित्रपटात करिना कपूरची मुख्य भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. मराठीतील 'आपला माणूस'चे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते आणि आता या रिमेकसाठी आशितोष गोवारीकर दिग्दर्शन करणार आहेत. करिनाचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' लवकरच रिलीज होणार आहे तर आशुतोष गोवारीकर 'पानीपत' या चित्रपटाचे दिग्दर्शन संपवून आपला माणूसच्या रिमेकला सुरुवात करणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...