आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBMarathi:कधीकाळी जीवलग मैत्रिणी होत्या आरती-मेधा, आता एकमेकींचे तोंड पाहण्यासही नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  मराठी बिग बॉस घरात सध्या स्पर्धकांमध्ये चछाओढीचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिग बॉसने दिलेल्या टास्कदरम्यान कलाकारांमध्ये एकमेकांसोबत वादही होताना दिसून येत आहे. मग ते घरातील स्वयंपाकघर असो अथवा साफसफाई सर्वच बाबतीत आपल्याला स्पर्धकांमधील विवाद दिसून येत आहे. बिग बॉस घरातच नाही तर त्याअगोदरही कलाकारंचे एकमेकांमध्ये असलेले वाद या शोमुळे बाहेर येत आहेत त्यातील एक वाद आता नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे तो म्हणजे आरती सोलंकी आणि मेधा धाडे यांच्यातील दुरावा. कधीकाळी होत्या सख्ख्या मैत्रीणी..

 

कधीकाळी एकमेकांच्या एकदम जीवलग मैत्रिणी असलेल्या आरती सोलंकी आणि मेधा धाडे बिग बॉसमध्ये एकमेकांचे तोंडही पाहणे पसंत करत नाहीत. फार कमी लोकांच्या लक्षात आले असेल की बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून आरती-मेधा यांचे एकमेकांशी बोलणे नाही. शोच्या पहिल्याच दिवशी मेधाला अभिनेत्री सई लोकूरने आरतीसोबत बोलण्यासाठी सांगितले होते पण मेधाने यासाठी ठाम नकार दिला. आरती आणि मेधा यांचे बिग बॉस घरात येण्याच्या एक वर्ष अगोदरपासून वादविवाद झाले होते पण ते नेमके कशामुळे झाले ते समजू शकले नाही. 

 

यानंतर कालच्या एपिसोडमध्येही स्वयंपाकघराची जबाबदारी असलेल्या स्पर्धकांमध्ये आरती सोलंकी आणि मेधा धाडे या दोघीही आहेत. यादरम्यान आरतीने मेधा सांगेल त्याप्रमाणे ती काम करणार नाही यावरुनच आता पुढच्या काही दिवसांत आरती आणि मेधा यांचे जुंपल्याचे दिसेल तर आश्चर्य वाटायला नको.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आरती सोलंकी आणि मेधा धाडे यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...