आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBMarathi:आरती सोलंकीच्या वडिलांनी केली आहेत दोन लग्ने, नंतर घेतला संन्यास, अशी आहे लाईफस्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी बिग बॉस घरात आरती सोलंकी सध्या चर्चेचा विषय आहे. उषा नाडकर्णी आणि आरती सोलंकी यांच्यात कधी प्रेमाचे तर कधी तणावाचे वातावरण पाहायला मिळते. आरती सोलंकी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तसेच कॉमेडियन म्हणून ख्याती आहे तर तिच्या बिनधास्त लाईफस्टाईलमुळे ती चर्चेचा विषय आहे. एका एपिसोडदरम्यान आरतीने तिच्या आयुष्याीतल काही खासगी गोष्टी शेअर केल्या. वडिलांनी केली आहेत दोन लग्ने.

 

वडिलांनी केली आहेत दोन लग्ने.. 
आरतीने बिग बॉस घरात तिच्या आयुष्याविषयी काही गोष्टी अनिल थत्ते यांच्यासमोर उघड केल्या. यावेळी तिने तिच्या वडिलांच्या दोन लग्नाची बातमी दिली. आरती सोलंकीची आई मुस्लिम तर दुसरी आई गुजराती आहे. आरतीच्या वडिलांनी त्यांचे अगोदर लग्न झालेले असतानाही फसवून आरतीच्या आईशी लग्न केले. आरतीचे वडील गुजराती तर आई मुस्लिम आहे आणि सत्य उघडकीस आल्यानंतर आरतीचे आईने वडिलांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आरतीच्या वडिलांनी  दोन्ही पत्नींना सोडून संन्यासाचा मार्ग निवडला 2011 साली त्यांचे निधन झाले. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, मच्छीमार्केटमध्ये काम करुन आईने केला सांभाळ..

बातम्या आणखी आहेत...