आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi:आस्ताद म्हणतो 'नायक नही खलनायक हु मै', वाचा काय घडले बिग बॉसच्या घरात!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल वीकेंडच्या डाव महेश मांजरेकरांसोबत घरातील सर्व सदस्यांनी चांगलाच एंजॉय केला. यावेळी नेहमीप्रमाणेच महेश मांजरेकरांनी यावेळी मेघा, आस्ताद, भूषण, सुशांत यांना आठवडाभरात झालेल्या घटनांनी खडसावले. यावेळी आस्ताद आणि सुशांत यांना घरातील महिलांशी गैरवर्तन आणि आवाज चढवून बोलण्याने आणि वागण्याने महेश मांजरेकर यांनी त्यांना चांगलेच खडसावले. 

 

यावेळी   एका गेम खेळण्यात आला त्यात घरातील सर्व सजस्यांना त्यांना जो व्हिलन वाटेल त्याच्या कपाळावर फुली मारायची होती आणि ज्याच्या कपाळावर सर्वात जास्त फुल्या होतील त्याला घरातील व्हिलन म्हणून घोषीत करण्यात येणार होते. यात आस्तादला सर्वात जास्त फुल्या मिळाल्या आणि त्याला घरातील व्हिलनसाठी असलेल्या खूर्चीवर बसवण्यात आले. तर सुशांतलाही आस्तादनंतर त्याने स्मिताशी केलेल्या विचित्र मस्करीबद्दल फुल्या मिळाल्या. या दोघांनंतर सई, मेघा, रेशम, स्मिता, पुष्कर यांनाही फुल्या मिळाल्या. 

 

कालच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड पार्टीही रंगली. त्यात रेशमने आय लव्ह यु या श्रीदेवीच्या गाण्यावर परफॉर्म केले. तर भूषण कडू - बाबुराव गणपतराव आपटे (हेराफेरी), आस्ताद काळे -अमर (अंदाज अपना अपना), स्मिता गौंदकर - मोहिनी (तेजाब), पुष्कर जोग (नाना पाटेकर) यांनी त्यांचे खास परफॉर्म्न्स सादर केले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, बिग बॉस घरातील कालच्या एपिसोडचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...