आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBDay6:आस्ताद काळे ठरला बिग बॉस घरातील दुसरा कॅप्टन, रेशम-राजेश रंगवणार खोटी लव्हस्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विनीत भोंडेनंतर आता बिग बॉस घरातील दुसरा कॅप्टन म्हणून अभिनेता आस्ताद काळेची  वर्णी लागली आहे. घरातील 15 सदस्यांपैकी 11 सदस्यांनी आस्तादच्या नावावर कॅप्टन म्हणून शिक्कामोर्तब केले तर कॅप्टनपदाची दुसरी उमेदवार असलेल्या स्मिता गौंदकरला 4 मते मिळाली आणि बहुमताने आस्ताद काळे कॅप्टन झाला. 

 

आता विनीतनंतर आस्ताद कॅप्टनपदाची जबाबदारी कशी निभावतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे आता बिग बृस घरामध्ये फोडा आणि राज्य करा याप्रमाणे खेळ सुरु धाला आहे. घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन गट पाहायला मिळत आहेत त्यातील एका गटात रेशम टीपणीस, आस्ताद काळे, राजेश श्रृंगारपुरे, भूषण कडू, सुशांत शेलार हे तर दुसऱ्या गटात, पुष्कर जोग, सई लोकूर, मेधा धाडे, आरती सोलंकी हे पाहायला मिळत आहेत.  

 

आता घरातील सर्वात प्रबळ उमेदवार समजले जाणारे रेशम टीपणीस, आस्ताद काळे, राजेश श्रृंगारपुरे, भूषण कडू, सुशांत शेलार यांनी एक नवा डाव रचलेला पाहायला मिळत आहे. रेशम आणि राजेश हे त्यांच्यामध्ये एक खोटी-खोटी रोमँटीक रिलेशनशीप तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत तर पुष्कर जोग आणि सई लोकूर यांची जोडी फोडण्याचा हे लोक प्रयत्न करताना दिसणार आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आस्ताद आणि स्मिता यांच्या कॅप्टनशीपसाठी वोटींग करताना घरातील सदस्य..

बातम्या आणखी आहेत...