आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBMarathi: आज घरात पेटणार वणवा, 'खूर्चीसम्राट' टास्कदरम्यान मेधा धाडेचा पुन्हा एकदा राडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या रहिवाश्यांची आजच्या दिवसाची सुरुवात 'सावधान सावधान वणवा पेट घेत आहे' या गाण्यावर होणार आहे. काल बिग बॉसने दिलेल्या 'खुर्ची सम्राट' या खेळावरून घरामध्ये बरीच भांडण झाली. रहिवाश्यांमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळाले. टीम रेशम विरुध्द टीम आस्ताद असे जरी खेळाचे दोन गट असले तरीदेखील टीम रेशम मधील स्पर्धकांनी आस्तादला वगळता बाकी सगळ्यांवर आपली नाराजगी, राग व्यक्त केला. काल या सगळ्यांचीच वेगळी रूपं प्रेक्षकांच्यासमोर आली असे म्हणायला हरकत नाही. घरातील सदस्यांची हि नाराजगी बघता आऊ म्हणजेच उषाजीं सगळ्यांची माफी मागितली. सई लोकुरला टीम रेशमची तिच्याप्रती असलेली वागणूक अजिबात आवडली नाही. या खेळानंतर घरामध्ये खरोखरच दोन ग्रुप पडलेले जाणवत आहेत, ते म्हणजे आस्ताद, रेशम, राजेश, भूषण, विनीत आणि सुशांत तर दुसरीकडे मेघा, उषाजी, पुष्कर, सई आणि ऋतुजा. आता विनीत आणि अनिल थत्ते नक्की कोणत्या गटात आहेत किंवा त्यांना कोणता गट आपलसं करेल हे येणारी वेळचं सांगेल. आज बिग बॉस घरामध्ये खेळा दरम्यान काय होणार ? कोण कोणावर हावी होणार? कोणता संघ विजयी ठरणार ? घरातले वातावरण अजून बिघडेल कि सदस्य हे सगळ सावरून घेतील ? हे बघणे खरोखरच रंजक असणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. 

 

आज पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये “खुर्ची सम्राट” हा खेळ रंगणार आहे. परंतु, आज टीम आस्ताद खुर्चीवर बसणार असून टीम रेशम त्यांना खुर्चीवरून उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे खेळत असताना टीम रेशम काल त्यांच्यावर झालेल्या गोष्टींचा बदला घेणार कि संयमाने खेळणार ते लवकरच कळेल. यामध्ये टीम आस्तादने टीम रेशम पेक्षा जास्त कालावधी पर्यंत खुर्चीवर बसून रहाणे अनिवार्य असणार आहे. खेळाच्या शेवटपर्यंत टीम आस्ताद मधील किमान एक तरी सदस्य त्या खुर्चीवर बसणे महत्वाचे असणार आहे आणि असे झाल्यास ती टीम विजयी ठरणार आहे.

 

आता नक्की कोणती टीम जिंकणार ? कोण कोणवर मात करणार ? मेघाला या खेळातून का बाहेर काढले ? या टास्क दरम्यान जुई – स्मितामध्ये कशावरून भांडण झाले ? मेघाला का रडू आले ? टास्क दरम्यान कोण चक्कर येऊन पडले ? आस्तादने मेघावर नाराजगी का व्यक्त केली ? हे सर्व आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, खूर्चीसम्राट टास्कदरम्यानचे काही खास फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...