आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत 'भय' फिल्मचे प्रमोशन करतोय अभिजीत खांडकेकर, या अभिनेत्री आहेत सोबतीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपटसृष्टीचा लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर त्याचा आगामी चित्रपट 'भय'च्या प्रमोशनसाठी दुबईला पोहोचला आहे. यावेळी चित्रपटातील त्याच्या सहअभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि स्मिता गौंडकर यासुद्धा त्याच्यासोबत दिसल्या. या तिघांनी त्यांचे या प्रमोशनदरम्यानचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 

 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आपल्या भेटीला येणारा गॅरी नेहमीच सुटबुटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण या प्रमोशनदरम्यान त्याच्या कॅज्युअल अंदाज दिसला. सोबतच संस्कृती आणि स्मिताही ग्लॅमरस रुपात दिसल्या. 

 

'भय' या आगामी चित्रपटात अभिजीत खांडकेकर स्क्रिझोफेनिया या आजाराने ग्रस्त असलेल्या तरुणाची भूमिका करत आहे. या चित्रपटात सतीश राजवाडे, संस्कृती बालगुडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 2016 रोजी प्रदर्शित होणार होता पण काही कारणाने याचे प्रदर्शन लांबले आणि आता अखेर हा चित्रपट येत्या 2 मार्च रोजी हा रिलीज होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिजीत खांडकेकर, संस्चेकृती बालगुडे आणि स्मिता गौंडकरचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...