आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीआरपीचे यशोशिखर गाठल्यावर \'गॅरी\'ने पत्नीसह सर केले हे \'शिखर\', पाहा काय आहे ते!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  अभिजीतची मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'ने सध्या टीआरपीची उंची गाठली आहे. त्यानंतर आता गॅरीने पत्नीसोबत एक नवीन उंची गाठली आहे. ती उंची आहे बुर्ज खलिफाची. अभिजीत खांडकेकर अर्थात गॅरी त्याची पत्नी सुखदासोबत सध्या दुबई व्हॅकेशनवर गेला आहे. अभिजीत आणि सुखदानेही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. त्यात दोघेही जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर फोटो काढताना दिसले. 

 

काही दिवसांपूर्वीच संपूर्ण टीमने 8.2 टीआरपी गाठल्याचे सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर अभिजीतचे 'पती गेले ग काठेवाडी' या नाटकालाही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत आहे. म्हणून तसे पाहिले तर अभिजीतसाठी या वर्षाची धमाकेदार सुरुवात झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिजीत आणि सुखदाचे काही खास PHOTOS...