आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता मिलींद गवळी यांच्या कन्येचे झाले शुभमंगल, अलका कुबल यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेता मिलींद गवळी यांची कन्या मिथीला गवळी हिचे शुभमंगल नुकतेच पार पडले आहे. या लग्नात अलका कुबल यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली. त्यात स्मिता जयकर, अर्चना नेवरेकर आणि ज्योती जोशी या कलाकारांचा समावेश आहे. लग्नादरम्यान या सर्व अभिनेत्री धम्माल मस्ती करताना दिसून आल्या. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल ह्यांनी अनेक दिवसानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 

 

या लग्नादरम्यान सर्व अभिनेत्री हातावर मेहंदी लावताना दिसल्या. हा लग्नसोहळा मुंबईत पार पडला. मिलींद गवळी यांचा जावई कोण याबद्दल सविस्तर माहिती अजून उपलब्ध नाही. मिलींद गवळी यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि मल्याळम चित्रपटातही काम केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलींद गवळी यांच्या मुलीच्या लग्नाचे काही खास Photos

बातम्या आणखी आहेत...